Uncategorized

CPR Blood Bank सीपीआरमध्ये खासगी ब्लड बँकेच्या एजंटचा सुळसुळाट

कोल्हापूर : सीपीआर येथील रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी घेऊन जाणाऱ्या एका खासगी रक्तपेढीच्या एजंटला स्थानिक गुन्हे अन्वेषण कक्षाच्या पथकाने सोमवारी ताब्यात घेतले. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने सहा महिन्यांपूर्वी एका लॅब चालकाला पकडून सीपीआर अधिष्ठाता डॉ. रेवन्नाथ मिसाळ यांना ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर खासगी कंपन्यांची येथे डेंटर मारण्याची नावे समोर आली होती.

संभाजी ब्रिगेडने निदर्शनास आणला मुद्दा

या कारभाराची चौकशी सुरू असताना पुन्हा संबंधित लॅब चालक सीपीआरमधये येऊन रक्तनमुने संकलन करत असल्याची बाब गुरुवारी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने निदर्शनास आणून दिली होती. जिल्हाध्यक्ष रेश्मा पाटील तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉ. मिसाळ यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. यावेळी शहराध्यक्ष अभिजीत कामगार, हर्ष करगीर, अतुल सावंत उपस्थित होते.

थोरला दवाखाना

कोल्हापूरातील ग्रामीण भागातील गोर गरीब लोकांसाठी सीपीआर हा एक मोठा आधारवड समजला जातो. आजही लोक सीपीआरला थोरला दवाखाना म्हणूनच ओळखतात. मुख्यत: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोक सीपीआर मध्ये होणाऱ्या मोफत उपचाराचा लाभ घेतात. यापूर्वीही सीपीआरच्या एकूण कारभाराविषयी वादग्रस्त मुद्दे समोर आले होते. ब्लड बँकेचा हा मुद्दा सध्या चर्चेत असला तरी यापूर्वीही अनेक रुग्णांच्या तक्रारी समोर आल्या होत्या. आता ब्लड बँकेतील एजंटाच्या घुसखोरीविरोधात प्रशासन काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​