Uncategorized

Argentina on a roll, storms into the semi-finals.

स्वित्झर्लंडवर 3-1 ने विजय, अल्वारेझ, मार्टिनेझ व मॅक अॅलिस्टरकडून प्रत्येकी एक गोल

वृत्तसंस्था, कॅन्सस सिटी, मिसुरी : छोट्याशा केप वर्दे संघाने अतिरिक्त वेळेपर्यंत झुंजवले असो किंवा इजिप्तने सामन्याच्या उत्तरार्धात दोन गोलांची आघाडी घेऊन अडचणीत आणले असो, लायोनेल मेस्सी आणि अर्जेंटिनाच्या संघाने नेहमीच अशा कठीण प्रसंगांत तग मारली आहे. शनिवारी रात्रीही असेच घडले. ज्युलियन अल्वारेझने 112 व्या मिनिटाला लांब अंतरावरून मारलेला गोल आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेत लाउटारो मार्टिनेझने केलेला गोल यांच्या जोरावर त्यांनी स्वित्झर्लंडवर 3-1 असा रोमांचक विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत धडक मारली.

मेस्सीच्या कॉर्नर किकवर अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टरने आणखी एक गोल केला. या विजयामुळे त्यांना बुधवारी अटलांटा येथे इंग्लंडविऊद्ध होणाऱ्या उपांत्य सामन्यात स्थान मिळाले आहे. स्वित्झर्लंडविऊद्धचा सामना एका अशा निर्णयामुळे वळण घेणारा ठरला, ज्यामुळे ‘विश्वचषकातील पंचांकडून अर्जेंटिनाला झुकते माप दिले जाते’ असे मानणाऱ्यांच्या भावना नक्कीच भडकल्या असतील. 67 व्या मिनिटाला डॅन एनडोयेच्या गोलमुळे स्वित्झर्लंडने सामना बरोबरीत आणला. त्यानंतर लगेचच ब्रिल एम्बोलोला पाडल्याबद्दल पारेडेसला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. मात्र, व्हिडिओमध्ये असे दिसून आले की, अर्जेंटिनाच्या मिडफिल्डरचा संपर्क होण्यापूर्वीच स्विस खेळाडू खाली पडला होता. एम्बोलोला सामन्यात याआधीच पिवळे कार्ड मिळाले असल्याने त्याला मैदानाबाहेर पाठवण्यात आले आणि स्वित्झर्लंडला 10 खेळाडूंसह बचाव करावा लागला.

1954 नंतर पहिल्यांदाच विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या स्वित्झर्लंडसाठी हा अत्यंत निराशाजनक शेवट ठरला. त्यांना अजूनही उपांत्य फेरीत धडक मारता आलेली नाही तसेच अर्जेंटिनासोबतच्या आठ सामन्यांत एकदाही विजय मिळवता आलेला नाही. सामन्याच्या बहुतांश भागात अर्जेंटिनाच्या भक्कम बचाव फळीला भेदण्यासाठी स्विस संघाला संघर्ष करावा लागला. त्यातच त्यांचा सर्वोत्तम गोल-स्कोअरर असलेल्या जोहान मंझाबीची अनुपस्थिती त्यांच्यासाठी अडचणीची ठरली. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो या सामन्याला मुकला.

मात्र दुसऱ्या सत्रात अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझला काही कठीण बचाव करण्यास भाग पाडल्यानंतर स्विस संघाने अखेर यश मिळवले. रिकार्डो रॉड्रिग्जने एनडोयेला एक अचूक पास दिला आणि त्याने सहजपणे चेंडू जाळीत सारला. सामना बरोबरीत आणल्यामुळे स्विस संघाला जो काही वेग मिळाला होता, तो काही मिनिटांनंतर एम्बोलोला मिळालेल्या ‘रेड कार्ड’मुळे मावळला. अर्जेंटिनाने त्यानंतर दबाव वाढवला. 89 व्या मिनिटाला मॅक अॅलिस्टरचा हेडर गोलपोस्टच्या बाहेर गेला, तर ‘स्टॉपेज टाइम’च्या दुसऱ्या मिनिटाला मेस्सीने गोलसमोर एक संधी निर्माण केली होती, पण त्याचा फटकाही थोडक्यात बाहेर गेला. यामुळे सामना बरोबरीत राहिला आणि तो अतिरिक्त वेळेत गेला.

मेस्सीची पाटी प्रथमच कोरी

स्वित्झर्लंडविरुद्ध गोल न करता आल्याने विश्वचषकातील सलग नऊ सामन्यांत गोल करण्याचा मेस्सीचा विक्रम तिथेच थांबला असला, तरी त्याचे दुसरे विश्वचषक जेतेपद जिंकण्याचे स्वप्न अजूनही कायम आहे. बचावात्मक खेळ करणाऱ्या स्विस संघाने त्यापूर्वीच्या पाच सामन्यांत केवळ तीन गोल स्वीकारले होते आणि सुऊवातीच्या काही मिनिटांत चेंडूवर त्यांचेच वर्चस्व होते. पण या स्पर्धेत फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेच्या बरोबरीने सर्वाधिक आठ गोल करणाऱ्या मेस्सीने आपल्या चपळ हालचालींच्या जोरावर सुऊवातीलाच एक ‘कॉर्नर किक’ मिळवून दिली आणि त्यानंतर दिलेल्या पासचे रूपांतर मॅक अॅलिस्टरने गोलमध्ये करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

 

अव्वल चारही संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याची पहिलीच वेळ

अर्जेंटिना आणि इंग्लंडने फ्रान्स व स्पेनसोबत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. फिफा क्रमवारीत अव्वल स्थानी असलेले चारही संघ या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​