Agriculture News | एकेकाळी ५० एकरांवर होतं साम्राज्य, आता थेट ५० टक्के बागा कुऱ्हाड लावून नष्ट; बांबवडे परिसरातील केळी उत्पादकांवर का आली ही वेळ?

बांबवडेतील केळी उत्पादक संकटात
पलूस (वैभव माळी ) -अलिकडच्या काळात पलूस तालुक्यातील बांबवडे गावाने केळी उत्पादनाच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे बांबवडे हे गाव दर्जेदार केळी उत्पादनाचे आगार म्हणून नावारूपाला येत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका येथील केळी उत्पादकांना बसला आहे.
निर्यात ठप्प झाल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असून सुमारे ५० टक्के केळीच्या बागा कमी करून शेतकरी ऊस व अन्य पर्यायी पिकांकडे वळल्याचे चित्र दिसून येत आहे. बांबवडे परिसरात एकेकाळी सुमारे ५० एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली जात होती. येथील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन आणि अथक परिश्रमाच्या जोरावर एकरी ३५ ते ४० टनांपर्यंत दर्जेदार केळीचे उत्पादन घेत होते.
येथील केळीला देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी होती. बांबवड्यातील केळी इराण, इराक यांसारख्या देशांमध्ये निर्यात होत होती. याशिवाय गोवा, मुंबई, रत्नागिरी, पुणे आदी प्रमुख बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणात विक्री केली जात होती.
मात्र यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यांत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात प्रक्रियेला अचानक ब्रेक लागला. परदेशी बाजारपेठा बंद झाल्याने तयार झालेला माल शेतातच अडकून पडला. घडांवरच केळीपिंकून गेल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. उत्पादन खर्च, मजुरी, औषधे आणि वाहतूक यासाठी केलेला खर्च वसूल होणेही कठीण झाले. स्थानिक बाजारपेठेत मिळणारे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी केळी उत्पादनातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
परिणामी परिसरातील सुमारे १५ एकरांहून अधिक क्षेत्रावरील केळीच्या बागा काढून टाकल्या असून त्या ठिकाणी ऊस तसेच अन्य नगदी पिकांची लागवड करण्यात येत आहे.केळी उत्पादनात असलेली अनिश्चितता आणि निर्यातीवरील अवलंबित्व यामुळे शेतकरी रपानिक बाजारपेठेबा पर्यायएक्सपोर्ट आणि स्थानिक बाजारपेठेतील दर जवळपास समान असल्याने शेतकरी स्थानिक बाजारपेठेतच माल विक्री करत आहेत. युद्धामुळे झालेले नुकसान भरून काढण्याची संधी आहे.
सुनील भोसले, केळी उत्पादकअधिक स्थिर उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळत आहेत.युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या या संकटाने बांबवडेतील केळी उत्पादकांची आर्थिक घडी विस्कटली असली तरी भविष्यात निर्यात पुन्हा सुरळीत झाल्यास केळी उत्पादनाला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
Source link



