गणेशभक्तांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ धावली; चाकरमान्यांचे कणकवलीत जल्लोषात स्वागत; पालकमंत्री नितेश राणे यांचा पुढाकार

कणकवली / प्रतिनिधी : गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईहून कोकणात आपल्या गावी येणाऱ्या गणेशभक्त चाकरमान्यांसाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेली मोफत ‘मोदी एक्स्प्रेस’ शुक्रवारी रात्री कणकवली रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी गणेशभक्तांचे गुलाबपुष्प देऊन उत्साहात स्वागत केले.
मुंबईहून सकाळी सुटलेली ‘मोदी एक्स्प्रेस’ रात्री कणकवली रेल्वे स्थानकात पोहोचताच ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. चाकरमान्यांच्या स्वागतासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.
यावेळी अनेक गणेशभक्त चाकरमान्यांनी मोफत रेल्वेसेवेमुळे गावी येण्याचा प्रवास अधिक सुखकर झाल्याची भावना व्यक्त केली. मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.
दरम्यान, गणेशभक्त चाकरमान्यांच्या सोयीसाठी आणखी एक ‘मोदी एक्स्प्रेस’ 13 सप्टेंबर रोजी मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना होणार आहे.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, राकेश परब, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, नगरसेवक मेघा गांगण, संदीप सावंत, सदा चव्हाण, सर्वेश दळवी, स्वप्निल राणे, समीर प्रभुगावकर, नयन दळवी, प्रशांत राणे, लक्ष्मण घाडीगावकर, सागर राणे, प्रज्वल वर्दम, सुभाष मालंडकर, अभय गावकर, सचिन पारधिये, विजय चिंदरकर, औदुंबर राणे, प्रियाली कोदे, अनिकेत गुरव आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
Source link



