Uncategorized

अभिनेता विकास समुद्रे यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ; मुंबई पोलिसांची तातडीने धाव

मुंबई : मराठी अभिनेते विकास समुद्रे यांच्या फेसबुक खात्यावरून करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे शनिवारी मोठी खळबळ उडाली. या पोस्टमध्ये आत्महत्येचा उल्लेख असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. पोस्टची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचताच मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू करत अभिनेत्याशी संपर्क साधला.

विकास समुद्रे यांच्या फेसबुक खात्यावरून “I am committing Suicide…” असा मजकूर प्रसिद्ध झाल्याचे समोर आले. ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत अभिनेत्याची काळजी व्यक्त केली. काही चाहत्यांनी त्यांना धीर देण्याचा आणि अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने तातडीने दखल घेतली. सायबर विभागाचे पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी स्वतः पुढाकार घेत अभिनेत्याशी संपर्क साधला. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर विकास समुद्रे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, फेसबुकवर करण्यात आलेल्या पोस्टमागे आत्महत्येचा कोणताही प्रयत्न नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोस्ट करताना झालेल्या टंकलेखनातील चुकीमुळे हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली. त्यामुळे काही काळ निर्माण झालेली चिंता दूर झाली असून अभिनेता सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे.
;

जुन्या आठवणींमुळे चाहत्यांची चिंता

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान विकास समुद्रे यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांबाबत भाष्य केले होते. काही वर्षांपूर्वी त्यांना मेंदूविकाराचा गंभीर त्रास झाला होता. त्या काळातील अनुभव आणि त्यातून गेलेला कठीण काळ त्यांनी या संवादात सांगितला होता. त्यामुळे फेसबुकवरील पोस्टनंतर चाहत्यांची चिंता आणखी वाढली.

नाटक आणि चित्रपटातून मिळवली ओळख

विकास समुद्रे यांनी मराठी रंगभूमीवर विविध नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. विनोदी भूमिकांसाठी त्यांना विशेष ओळख मिळाली. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या अधिक परिचयाचे झाले. त्यानंतर त्यांनी विविध विनोदी आणि लक्षवेधी भूमिका साकारत मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​