Uncategorized

बोरी साईबाबा मंदिराचा ताबा देताना तणाव

25 ग्रामस्थांना प्रतिकात्मक अटक व सुटका: न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याने कारवाई

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बोरी येथील श्री साईबाबा मंदिर व्यवस्थापनाचा ताबा दिनेश रायकर व त्यांच्या समितीकडे सोपविण्याच्या प्रक्रियेवेळी ग्रामस्थांनी जमाव कऊन मंदिरात ठाण मांडल्याने तणाव निर्माण झाला. ग्रामस्थ मंदिरातून हटायला तयार नसल्याने मोठ्याप्रमाणात तैनात असलेल्या पोलिसांनी ग्रामस्थांना प्रतिकात्मक अटक केली. त्यामध्ये 21 महिला व 4 पुऊषांचा समावेश होता.

 त. भा. प्रतिनिधी

बोरी साईबाबा मंदिरच्या व्यवस्थापनावऊन दोन गट पडले आहेत.  त्यातून हा वाद निर्माण झाला आहे. तीन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाच्या निकालानुसार मंदिर व्यस्थापनाचा ताबा अध्यक्ष दिनेश नंदा रायकर व त्यांच्या समितीकडे आलेला आहे. मात्र साईबाबा मंदिर परिसरातील आवेडे, तळीवाडा व मांगिरवाडा या तीन वाड्यांवरील ग्रामस्थांनी दिनेश रायकर व त्यांच्या समितीवर गैरव्यवस्थापनाचे आरोप करीत मंदिराचा ताबा घेतला होता.

 रायकर समिती गेली न्यायालयात

याप्रकरणी कारवाई करण्यास फोंडा पोलिसांनी विलंब केल्याचा आरोप करीत दिनेश रायकर व त्यांच्या समितीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायलयाच्या आदेशानंतर ग्रामस्थ अक्षय तिळू नाईक यांच्यासह तीस जणांवर बेकायदेशीर जमाव कऊन मंदिरात प्रवेश करणे, मंदिराची मालमत्ता  असलेल्या कार्यालयाला टाळे लावणे व अन्य गुन्हे नोंदवून तिघाजणांना अटक करण्यात आली होती.

 टाळे तोडून, ताबा देण्याचा आदेश

तक्रारदार दिनेश रायकर व समितीने दाखल केलेल्या या याचिकेवर 5 सप्टेंबर रोजी न्यायालयाने निकाल दिला. ग्रामस्थांनी बेकायदेशीररित्या लावलेले टाळे तोडून रायकर यांच्या समितीकडे पुन्हा मंदिरचा व्यवस्थापनाचा ताबा द्यावा असे या निकालात म्हटले होते.

 न्यायालयीन आदेशाची कार्यवाही

न्यायालयीन आदेशाच्या कार्यवाहीची अंमलबजावणीसाठी तारीख काल शुक्रवार दि. 11 रोजी निश्चित करण्यात आली होती. या कारवाईच्यावेळी पुन्हा तणाव होऊ नये यासाठी मंदिराच्या आवारात मोठ्याप्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र या कारवाईच्यावेळी ग्रामस्थांनी पुन्हा मंदिरात जमाव कऊन ठाण मांडल्याने तणाव निर्माण झाला. मामलेदार व अन्य अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना संयम पाळून कायदा सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन केले.

 सरकारी कामकाजात अडथळा आणला

ग्रामस्थ आपल्या भूमिकेपासून माघार घेण्यास तयार नसल्याने अखेर पोलिसांना हस्तक्षेप करीत सरकारी कामकाजात अडथळे आणल्याप्रकरणी ग्रामस्थांना ताब्यात घ्यावे लागले. मंदिराच्या आवारात जमलेल्या 21 महिला व 4 पुऊष अशा पंचवीस जणांना प्रतिकात्मक अटक करण्यात आली. या सर्वांना ताब्यात घेऊन म्हार्दोळ व फोंडा पोलीस स्थानकात नेण्यात आले. सायंकाळी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केल्यानंतर या सर्वांची सुटका करण्यात आली.  या कारवाईनंतर दिनेश रायकर व त्यांच्या समितीकडे मंदिर व्यवस्थापनाचा रितसर ताबा सुपुर्द करण्यात आला. यावेळी फोंडा तालुक्याच्या मामलेदार सिद्धी पै. आंगले, फोंडा पोलिसस्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​