Uncategorized

दांडेलीत बंदिस्त घरात रंगला रमीचा डाव; पोलिसांच्या छाप्यात 11 जण ताब्यात; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी : शहर वार्ताहर : सावंतवाडी तालुक्यातील दांडेली-धनगरवाडी येथे बंदिस्त घरात सुरू असलेल्या अवैध रमी जुगार क्लबवर सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पैशांची बाजी लावून रमी खेळणाऱ्या 11 जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, दुचाकी वाहने तसेच जुगार क्लब चालवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडेली-धनगरवाडी येथील घर क्रमांक 501 मध्ये बंदिस्त स्वरूपात जुगार क्लब सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.

घरमालक श्रीकृष्ण पुनाळेकर याने राजकुमार कवठणकर याला जुगार क्लब चालवण्यासाठी घरात जागा उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. छाप्यावेळी या ठिकाणी पैशांची बाजी लावून रमी खेळताना 11 जण आढळून आले.

या प्रकरणी श्रीकृष्ण गोविंद पुनाळेकर (45, रा. दांडेली), राजकुमार दिनकर कवठणकर (रा. कवठणी), गणेश शांताराम सोपटे (48, रा. किनळे-वरचीवाडी), सुधीर सोमनाथ राऊळ (41, रा. कुडाळ-तेंडोली), नंदकिशोर मनोहर नाईक (57, रा. किनळे-भटवाडी), अनंत भास्कर सारंग (60, रा. सावंतवाडी-सालईवाडा), निरंजन आनंद नाईक (32, रा. आरोस-गिरोबावाडी), आनंद सोहन केरकर (59, रा. मळेवाडा-परबवाडी), गजानन महादेव वाडकर (58, रा. सबनीसवाडा, सावंतवाडी), श्रीधर प्रकाश पालव (34, रा. तळवणे-पालवाडी) आणि मिलन शांताराम खवणेकर (44, रा. शिरोडा-वरचीकेरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल राहुल बर्गे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई प्रो. डीवायएसपी शेलार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि एपीआय हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सातार्डा दूर क्षेत्राचे एएसआय टाकेकर पुढील तपास करीत आहेत.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​