डोनाल्ड ट्रम्प यांनी बदलले कॅनडाशी संबंधित सरोवराचे नाव

लेक ओंटारियो आता ठरणार लेक अमेरिका
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लेक ओंटारियोचे नाव बदलून ‘लेक अमेरिका’ करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. यानुसार 30 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि यानंतर अमेरिकेच्या सरकारी नकाशा आणि नोंदीमध्ये नव्या नावाचा वापर केला जाणार आहे.
ट्रम्प यांनी या निर्णयाची तुलना मेक्सिकोच्या उपसागराचे नाव बदलून ‘अमेरिकेचा उपसागर’ करण्याशी केली. आता अमेरिकेकडे एक सरोवर अन् एक उपसागर आहे, बहुधा पुढीलकाळात अटलांटिक किंवा प्रशांत महासागराचे नाव बदलण्याविषयी विचार करावा लागेल अशी टिप्पणी ट्रम्प यांनी थट्टेच्या सुरात केली आहे.
तर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी लेक ओंटारियोचे नाव बदलण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. अमेरिका नाव बदलत आहे हे आम्ही जाणतो, परंतु प्रत्यक्षात याचे नाव लेक ओंटारियोच आहे हे कॅनडावासीय जाणून आहेत. कॅनडा या सरोवराला आंsटारियो नावानेच संबोधिणार असल्याचे कार्नी यांनी म्हटले आहे.
लेक ओंटारियो अमेरिका आणि कॅनडादरम्यान स्थिती 5 मोठ्या सरोवरांपैकी एक आहे. याच्या एका बाजूला न्यूयॉर्क आणि दुसऱ्या बाजूला कॅनडाचा ओंटारियो प्रांत आहे. दोन्ही देशांच्या सीमा याच सरोवरातून जातात.
Source link



