Uncategorized

Satara News | नोकरी गेल्याच्या निषेधार्थ हाय व्होल्टेज टॉवरवर चढले डॉक्टर; सायनमध्ये थरार!

फलटण -फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांनी नोकरीवरून काढल्याच्या निषेधार्थ मुंबईतील सायन रेल्वे स्थानक परिसरातील हाय व्होल्टेज टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ खळबळ उडाली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करून त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवले.

गुरुवारी सकाळी सुमारे पावणेआठ ते आठच्या दरम्यान सायन रेल्वे स्थानकातील हाय व्होल्टेज टॉ बरबर एक व्यक्ती चढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचेगांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टॉवरवर असलेल्या व्यक्तीशी संवाद साधत खाली येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी टॉवरवरच टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य हाती घेतले. अथक प्रयत्नांनंतर संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे खाली आणण्यात आले.

खाली आणल्यानंतर संबंधित व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर जवानांनी तातडीने सीपीआर देत प्राथमिक वैद्यकीय मदत केली. त्यांच्या या तत्परतेमुळे संबंधिताचा जीव वाचवण्यात यश आले. त्यानंतर डॉ. रुपनवर यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात आले. दाखल करण्यातया घटनेमुळे सायन रेल्वे स्थानकपरिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमागील नेमकी कारणे आणि अन्य बाबींचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​