वेंगुर्ले मोटारसायकल चोरीप्रकरणी संशयित गोव्यातून ताब्यात ;स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; पुढील तपासासाठी संशयित वेंगुर्ले पोलिसांच्या ताब्यात

वेंगुर्ले / वार्ताहर : वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील दुसऱ्या संशयितास सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यातून ताब्यात घेतले. धीरज दिलीप गुप्ता (20, रा. गणेशनगर, कोलवाळ, गोवा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 89/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 303 (2) नुसार मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू होता.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने गोव्यात सापळा रचून धीरज गुप्ता याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी संशयितास वेंगुर्ले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डॉमीनिक डिसोझा, हेड कॉन्स्टेबल जॅकसन गोन्सालवीस, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, महेश्वर समजिस्कर आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री परब (सायबर) यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Source link



