Uncategorized

आरे देवीचीवाडी केंद्रशाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश साना कांबळेचा जिल्ह्यात पाचवा क्रमांक; रिषभ सौम्यालाही शिष्यवृत्ती

देवगड / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा आरे-देवीचीवाडीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या परीक्षेत ग्रामीण विभागातून साना शशिकांत कांबळे हिने 84 टक्के गुण मिळवत ‘राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती’ पटकावली. विशेष म्हणजे तिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळविला. तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेतही तिने जिल्ह्यात चौथा आणि देवगड तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.

रिषभ नितीन कोकम याने 62 टक्के गुण मिळवत ‘ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती’ मिळविली. तर सौम्या संदीप लोके हिने 55.33 टक्के गुण प्राप्त केले.

या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक विवेक कुळकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक पी. एस. जाधवर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शमिका लोके, सरपंच ममता कदम, शिक्षकवृंद, विविध समित्यांचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​