Uncategorized

देवदत्त पडिक्कलचे नाबाद शतक; जडेजाचे अर्धशतक

सरावाचा सामना, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, सारांश जैन दुखापतीमुळे निवृत्त

वृत्तसंस्था, कोलंबो

सध्या भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला असून उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. तत्पूर्वी या दौऱ्यातील शुक्रवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या सरावाच्या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात देवदत्त  पडिक्कलने नाबाद शतक (142) तर रविंद्र जडेजाने अर्धशतक (63) झळकविले. श्रीलंका इलेव्हन संघाने पहिल्या डावात 8 बाद 363 धावा जमविल्यानंतर भारताने दिवसअखेर 6 बाद 357 धावा केल्या.

या सरावाच्या सामन्यात श्रीलंका इलेव्हन संघाच्या पहिल्या डावात निशान फर्नांडो, रविंदु रसंता आणि कर्णधार सोनल दिनुशा यांनी शानदार अर्धशतके झळकविली. श्रीलंका इलेव्हन संघाने आपला पहिला डाव 8 बाद 363 धावांवर घोषित केला. भारतातर्फे रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ब्रारने 1 बळी मिळविला.

शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या पहिल्या डावाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीचा यशस्वी जैयस्वाल खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद झाला. त्यानंतर गिलच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 96 धावांची भागिदारी केली. राहुलने 67 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 40 धावा जमविल्या.

देवदत्त पडिकल आणि अष्टपैलु रविंद्र जडेजा या जोडीने संघाचा सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भागिदारी केली. जडेजाला दुखापत झाल्याने तो निवृत्त झाला. त्याने 117 चेंडूत 7 चौकारांसह 63 धावा जमविल्या. ऋषभ पंत आणि ध्रुव ज्युरेल हे दोन फलंदाज लवकर बाद झाले. अष्टपैलु मानव सुथारने देवदत्त पडिक्कल  समवेत पाचव्या गड्यासाठी 82 धावांची भागिदारी केली. मानव सुतारने 90 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 41 धावा जमविल्या. कुलदीप यादवला एका धावेवर असताना दुखापत झाल्याने तो तंबूत परतला. मोहम्मद सिराजने 1 धाव केली. सारांश जैनने 45 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावा जमविल्या. दुखापत झाल्याने जैनने निवृत्ती पत्करली. गुरनूर ब्रारने 18 चेंडूत आक्रमक फटकेबाजी करताना 4 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद जलद 36 धावा झोडपाताना देवदत्त  पडिक्कल समवेत सातव्या गड्यासाठी अभेद्य 101 धावांची शतकी भागिदारी केली.  पडिक्कलने 164 चेंडूत 18 चौकारांसह नाबाद 142 धावा जमविल्या. दिवसअखेर भारताने पहिल्या डावात 90 षटकांत 6 बाद 357 धावा जमविल्या असून अद्याप भारतीय संघ 6 धावांनी पिछाडीवर आहे. लंकेतर्फे रमेश मेंडीस आणि अशांका मनोज यांनी प्रत्येकी 2 तर विश्वा फर्नांडो आणि नुवांता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: श्रीलंका इलेव्हन प. डाव: 8 बाद 363 डाव घोषित (निशान फर्नांडो 66, रविंदु रसांता 71, सोनल दिनुशा 52, सूर्यबंदारा 35, रत्ननायके 39, विक्रम सिंगे 31, रमेश मेंडीस 32, अवांतर 14, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार प्रत्येकी 2 बळी, ब्रार 1-49), भारत प. डाव 90 षटकांत 6 बाद 357 (देवदत्त पडिक्कल खेळत आहे 142, ब्रार खेळत आहे 36, रविंद्र जडेजा 63, केएल राहुल 40, मानव सुथार 41, सारांश जैन 22, रमेश मेंडीस व अशांका मनोज प्रत्येकी 2 बळी, विश्वा फर्नांडो आणि नुवांता प्रत्येकी 1 बळी).

17 वर्षांनंतर भारतात होणार स्पर्धा

17 ते 23 ऑगस्टपर्यंत आयोजन

सात्विक-चिरागचा पहिला सामना स्कॉटिश थोडीशी

ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद जोडीवरही राहील नजर


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​