ट्रम्प यांचे जावई केरळ भेटीवर

वृत्तसंस्था
अलाप्पुझा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि उद्योगपती मायकल बूलोस यांनी शनिवारी केरळमधील अलाप्पुझा येथे अनपेक्षित भेट दिली. त्यांनी मुसळधार पावसात प्रसिद्ध बॅकवॉटरचा आनंद घेत हाऊसबोट सफरीचा अनुभव घेतला. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बोलस यांचे भारतात स्वागत करताना लिहिले, ‘भारतात तुमचे पुन्हा स्वागत आहे!’ असे ट्विट केले आहे. केरळमध्ये माझ्या मित्राला भेटून मला खूप आनंद होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यापूर्वी बूलोस यांनी आपल्या पत्नीसोबत दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आणि ताजमहालला भेट दिली होती. सध्या केरळमध्ये मुसळधार पाऊस असतानाही बूलोस यांनी अलाप्पुझा येथील प्रसिद्ध बॅकवॉटर आणि हाऊसबोट्सचा अनुभव घेतल्याने त्यांची ही भेट विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
मायकल बूलोस हे एक उद्योगपती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी टिफनी ट्रम्प यांचे पती आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेतील ह्यूस्टन येथे झाला असून त्यांचे बालपण लागोसमध्ये गेले. मायकल बूलोस आणि टिफनी ट्रम्प यांचा विवाह 2022 मध्ये झाला. या जोडप्याने मे 2025 मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला होता
गेल्या काही दिवसांपासून अलाप्पुझामध्ये सतत पाऊस पडत असूनही बूलोस यांनी प्रसिद्ध बॅकवॉटर परिसरात वेळ घालवत हाऊसबोटमधून आजूबाजूच्या नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेतला. त्यांच्या अनपेक्षित आगमनाने अलाप्पुझाच्या लोकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. अलाप्पुझाला अनेकदा ‘पूर्वेकडील व्हेनिस’ म्हटले जाते. हा परिसर त्याच्या विस्तृत बॅकवॉटर नेटवर्क, कालवे आणि पारंपरिक हाऊसबोट्ससाठी जगभरात ओळखला जातो. बूलोस यांच्या भेटीमुळे शनिवारी हे पर्यटनस्थळ आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले.
Source link



