Uncategorized

गुंडगिरी प्रतिबंधक पथकाची कारवाई

पाच जिल्ह्यांतील 23 जणांवर तडीपारीची कारवाई : गावगुंडांवर पथकाची करडी नजर

बेळगाव उत्तर विभागातील पाच जिल्ह्यांत गुन्हेगारी कारवायात गुंतलेल्यांची कंबर मोडण्यासाठी उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी प्रत्येक जिल्ह्यात गुंडगिरी प्रतिबंधक पथक नेमले असून या पथकांच्या कारवाईने गावगुंडांच्या उरात धडकी भरली आहे. गेल्या महिन्याभरात पाच जिल्ह्यांतील 23 जणांना तडीपार करण्यात आले आहे.

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पोलीस महानिरीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गुंडगिरी, हप्तावसुली, अमलीपदार्थांची विक्री, शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोहीम तीव्र करण्याची सूचना उत्तर विभागातील अधिकाऱ्यांना केली आहे. केवळ गेल्या महिन्याची आकडेवारी लक्षात घेता गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांविरुद्ध त्यांनी आघाडीच उघडल्याचे दिसून येते.

गुंडगिरी करणाऱ्यांवर सतत नजर ठेवण्याबरोबरच त्यांच्या कारवायांची माहिती मिळवण्यासाठी गुंडगिरी प्रतिबंधक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात 19, विजापूर जिल्ह्यात 11, बागलकोट जिल्ह्यात 9, धारवाड जिल्ह्यात 6 व गदग जिल्ह्यात 8 अशी एकूण 53 पथके कार्यरत आहेत. पाच जिल्ह्यांतील 148 गुन्हेगारांवर खबरदारीच्या उपाययोजनेंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यात 32 जणांवर कारवाई झाली असून विजापूर जिल्ह्यात सर्वाधिक 70 गावगुंडांवर खबरदारीच्या उपाययोजनेंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बागलकोट जिल्ह्यात 20, धारवाड जिल्ह्यात 2 व गदग जिल्ह्यात 24 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. विजापूर जिल्ह्यात 1, बागलकोट जिल्ह्यात 10, धारवाड जिल्ह्यात 2, गदग जिल्ह्यात 10 अशा एकूण 23 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या महिन्याभरात बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील प्रत्येकी 2 या प्रमाणे 6 जणांवर गुंडा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सातत्याने गुन्हेगारांच्या कारवायांवर नजर ठेवून त्यांच्या वागणुकीत बदल झाला नाही तर अशा गुन्हेगारांवर कोका कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे. हारुगेरी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या एका गुन्हेगारी प्रकरणातील पाच संशयितांवर कोका कायद्यावर कारवाई झाली आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​