Uncategorized

म्हापणला ७ ऑगस्ट रोजी मान्सून महोत्सव

कुडाळ / प्रतिनिधी : म्हापण येथील उत्साही मित्रमंडळाच्यावतीने तसेच वांद्रे – मुंबई शिवसेना (शिंदे) विभागप्रमुख कुणाल उर्फ बंटी सरमळकर यांच्या पुरस्कृत सहकार्याने श्री देवी सातेरी मंदिरात ७ ऑगस्ट रोजी मान्सून महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त सायंकाळी ७.३० वाजता दशावतारातील दिग्गज कलाकारांच्या संचात संयुक्त दशावतार मंडळाचे ‘हीच ती इंद्रायणी’ हे नाटक सादर होणार आहे.

या नाटकात इंद्र – गौरव शिर्के, वरुणदेव – सागर गावकर, नारद – चारुहास मांजरेकर, वायुदेव – नारायण आसयेकर, रंभा – गोट्या येरागी, गरुड – मोरेश्वर सावंत, माळी – उपरिचर वसू, संदेश वेंगुर्लेकर, मच्छिंद्रनाथ – बाबा मयेकर, सची – सुधीर तांडेल, नंदी – उदय मोर्ये, चरपटीनाथ – दत्तप्रसाद शेणई, तर मीनानाथची भूमिका बालकलाकार करण जळवी साकारणार आहेत. या नाटकाला हार्मोनियमवर मयूर गवळी, पखवाजवर किसन नेमळेकर आणि झांजवादनासाठी विनायक सावंत यांची संगीतसाथ लाभणार आहे. या नाटकाची कथा संकल्पना विश्राम (बाळा) राऊळ (खवणे) यांची आहे.

अमृतनाथ दशावतार मंडळ (म्हापण) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्साही मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ (नाथा) मडवळ व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​