Uncategorized

निकिताला रौप्य तर कामना, गरिमा यांना कांस्य

वृत्तसंस्था, बाकू (अझरबैजान)

येथे सुरू असलेल्या 2026 च्या 17 वर्षांखालील वयोगटातील विश्व युवा कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या महिला मल्लांनी दर्जेदार कामगिरी करताना विविध वजन गटात एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली. निकिता सेहरावतने रौप्यपदक तर कामना आणि गरिमा यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक मिळविले.

महिलांच्या 57 किलो वजन गटामध्ये भारताच्या निकिता सेहरावतने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मात्र अंतिम लढतीत अमेरिकेच्या इपेन्सा इलिसनने निकिताचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. साहजिकच निकिता सेहरावतला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

महिलांच्या 49 किलो गटातील कांस्यपदकासाठीच्या लढतीत भारताच्या कामना बाबलने रशियाच्या इरिना सिडेव्हाचा 3-2 अशा गुणांनी पराभव केला. मात्र उपांत्य फेरीच्या लढतीत जपानच्या सायका उचिदाकडून कामनाला हार पत्करावी लागली. महिलांच्या 73 किलो वजन गटातील खेळविण्यात आलेल्या कांस्यपदकासाठीच्या लढतीत गरिमाने स्पेनच्या पेरेझचा 10-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव केला. मात्र या वजन गटातील उपांत्य लढतीत अमेरिकेच्या मॅन्युअलने कामनाचा पराभव केला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​