Uncategorized

फ्रेशर्स पार्टीत विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याचा संदेश

सावंतवाडी, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि व्यावसायिक जडणघडणीत लोकमान्य ट्रस्टचा मोठा वाटा आहे. ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकूर यांनी या भागातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक विकासासाठी बिझनेस मॅनेजमेंट आणि हॉटेल मॅनेजमेंटसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे दालन खुले केले आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मिळवलेले यश महाविद्यालयीन जीवनातही टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स हे दर्जेदार शिक्षण देणारे आणि विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया भक्कम करणारे महाविद्यालय आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले.

लोकमान्य टिळक संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित फ्रेशर्स पार्टी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘संवाद तरुण भारत’चे सावंतवाडी प्रतिनिधी तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत होते. यावेळी प्राचार्य यशोधन गवस यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

अमोल चव्हाण पुढे म्हणाले, “लोकमान्य ट्रस्टने दूरदृष्टी ठेवून बिझनेस मॅनेजमेंट व हॉटेल मॅनेजमेंटसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दालने खुली केली आहेत. विद्यार्थ्यांनी ताण-तणाव न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून शालेय जीवनातील यश महाविद्यालयीन जीवनातही कायम राखावे.” तसेच अध्यक्षीय मनोगतात ॲड. संतोष सावंत म्हणाले, “बिझनेस मॅनेजमेंटची निवड करून विद्यार्थ्यांनी करिअरची योग्य दिशा निवडली आहे. मेहनत, शिस्त, सकारात्मक विचार आणि व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर यशस्वी करिअर घडविताना पालक, शिक्षक व संस्थेचा आदर राखावा.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य यशोधन गवस यांनी केले. सूत्रसंचालन दीक्षा काकतकर आणि गौरव गावडे यांनी केले, तर आभार प्रा. साईप्रसाद पंडित यांनी मानले. यावेळी अस्मिता गवस, प्रा. साईप्रसाद पंडित, आनंद नाईक, शैलेश गावडे, मेघा मयेकर, तृप्ती नाईक, लेखा डुबळे तसेच प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या केले.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​