‘बाधा’ दूर करणारे मंदिर

उत्तर प्रदेशातील पुरातन नागेश्वर धाम मंदिर सध्या पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. भक्तांची सर्व प्रकारची ‘बाधा’ दूर करण्याचे सामर्थ्य या मंदिरात आहे, अशी भक्तांची भावना आहे. सध्या उत्तर भारतात श्रावण मासारंभ झाला आहे. हिंदूंसाठी पवित्र असणाऱ्या या महिन्यात या मंदिरात भक्तांची संख्या अमाप असते. साऱ्या भारतातून आणि विदेशांमधूनही येथे भक्त येत असतात. या मंदिराची अनेक वैशिष्ट्यो आहेत. या मंदिरासंबंधी अनेक आख्यायिकाही आहेत.
श्रावण महिन्यात या मंदिरात अभिषेक आणि पूजाआर्चा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. त्यामुळे या महिन्यात या मंदिरात भक्तांची प्रचंड गजबज असते. या मंदिराला 300 वर्षांचा इतिहास आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर शहरापासून हे मंदिर जवळपास 35 किलोमीटर दूर आहे. या मंदिराचे विशेष वैशिष्ट्या असे, की ज्यांचे विवाह होत नाहीत, त्यांनी या मंदिरात येऊन भगवान शिवशंकराचे दर्शन घेतले, अभिषेक केला आणि नवस बोलला तर त्यांचे विवाह होतात. ही श्रद्धा केवळ उत्तर प्रदेशातच नाही, तर ती उत्तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये आहे. त्यामुळे विवाहेच्छू पुरुष आणि महिला यांची विशेष संख्या श्रावण महिन्यात या मंदिरात असल्याची दिसून येते. केवळ हे मंदिर नाही, तर याचा परिसरही अत्यंत पवित्र आणि शुभकारक मानला जातो. या परिसरात अनेक असे वृक्ष आहेत, की ज्यांच्यामुळे येथील वातावरण प्रसन्न राहते. वातावरणात ‘सकारात्मक ऊर्जे’चा संचार असतो. त्यामुळे या परिसरात येताक्षणीच मनाला मोठी प्रसन्नता लाभते, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये या मंदिराची प्रसिद्ध अधिकच वाढली असून प्रतिवर्ष कोणत्याही महिन्यात, तसेच विशेषत: श्रावण महिन्यात या मंदिरात भारताच्या सर्व भागांमधून लक्षावधी भाविक येथे येतात. धर्मपर्यटनाचे एक महत्वाचे स्थान म्हणून हे मंदिर ओळखले जात आहे.
Source link



