उद्या चराठा शाळा मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा

ओटवणे प्रतिनिधी : चराठा येथील पी एम श्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका जयश्री जयप्रकाश पेडणेकर या आपल्या ३६ वर्ष ६ महिन्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर शुक्रवारी ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त शाळेत शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सौ. जयश्री पेडणेकर यांनी देवगड, तेंडोली, ओटवणे, निरवडे येथील प्राथमिक शाळांमध्ये सेवा बजावून त्या चराठा शाळेत दाखल झाल्या. नाविन्यपूर्ण उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्या परिचित आहेत. आपल्या शैक्षणिक सेवेत त्यांनी गुणवत्तापूर्ण व शैक्षणिक विकासाचे उपक्रम राबवले. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश परब सर्व पदाधिकारी व शिक्षक यानी केले आहे.
Source link



