Uncategorized

इराणविरोधी युद्धात सौदी अरेबियाची एन्ट्री

अमेरिकेसोबत सामील होऊन इराकमधील इराण-समर्थक योद्ध्यांवर हल्ला : 20 जण ठार

वृत्तसंस्था

बगदाद, तेहरान

अमेरिका-इराण यांच्यातील युद्धात आता सौदी अरेबियाही उतरला आहे. सौदी अरेबियाने अमेरिकेसोबत मिळून मंगळवारी रात्री इराकमधील इराण-समर्थक ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’च्या (पीएमएफ) योद्ध्यांच्या तळांवर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात 20 जण ठार झाल्याचा दावा केला जात असून तब्बल 32 जण जखमी झाले आहेत.

अमेरिकन लष्कराच्या म्हणण्यानुसार, हे तळ अमेरिकी सैन्य आणि सौदी अरेबियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. हल्ल्यानंतर काही तासांतच इराणने प्रत्युत्तर म्हणून अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs डागली. ही क्षेपणास्त्रs जॉर्डनमधील एका अमेरिकी लष्करी तळाला लक्ष्य करून डागण्यात आली होती. ही सर्व क्षेपणास्त्रे हवेतच रोखण्यात आली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराकमधील मिलिशियाच्या तळांवरून धूर निघताना दिसला. याचे काही व्हिडिओ व्हायरल होत असून हल्ला झालेल्या भागात प्रचंड दहशत निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

इराकमधील अमेरिकन नागरिकांसाठी सुरक्षा सूचना जारी

बगदादमधील अमेरिकी दूतावासाने इराकमधील अमेरिकी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. इराण-समर्थित गटांनी केलेल्या अलीकडील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही सूचना जारी करण्यात आली. दूतावासाने अमेरिकी नागरिकांना स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवण्याचे आणि इराकी अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सुरक्षा परिस्थितीमुळे हवाई क्षेत्र बंद केले जाऊ शकते किंवा पूर्वसूचनेशिवाय उ•ाणे विस्कळीत होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. दूतावासाने प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा सल्लाही दिला आहे.

होर्मुझसंबंधी संसदेत नवीन कायदा आणणार : इराण

अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझ सामुद्रधुनीवरून सुरू असलेली रस्सीखेच अजूनही कायम आहे. होर्मुझची सामुद्रधुनी इराणची आहे आणि ती नेहमी आमचीच राहील, असे इराणने पुन्हा एकदा म्हटले आहे. इराणची संसद होर्मुझ सामरिक सागरी मार्गाच्या व्यवस्थापनाशी संबंधित एका नवीन कायद्यावर विचार करत असल्याचे इराणच्या संसदेचे उपसभापती अली निकझाद यांनी बुधवारी सांगितले. संसदेच्या सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. तथापि, त्यांनी प्रस्तावित कायद्यातील तरतुदी किंवा तो मंजूर झाल्यास कोणते बदल केले जातील, हे स्पष्ट केले नाही. साहजिकच सद्यस्थितीत इराण या सागरी मार्गावरील आपले हक्क सोडणार नसल्याचे दिसते.

अमेरिका-इराणच्या कात्रीत सापडतोय इराक

अमेरिका आणि इराण हे दोन विरोधक असल्यामुळे इराकची प्रचंड कोंडी होताना दिसत आहे. जेव्हा-जेव्हा या दोन देशांमध्ये तणाव वाढतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्वात आधी इराकवर होतो. इराकमध्ये इराणला पाठिंबा देणारे अनेक सशस्त्र गट आहेत. त्यापैकी बहुतेक गट ‘इस्लामिक रेझिस्टन्स इन इराक’च्या छत्राखाली कार्यरत आहेत. युद्धाच्या सुरुवातीला त्यांनी इराणमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता. दुसरीकडे, अमेरिका देखील इराकचा एक प्रमुख मित्रराष्ट्र आहे. इराकची सुरक्षा आणि लष्कर मजबूत करण्यात अमेरिकेने मोठी भूमिका बजावली आहे. याच कारणामुळे, इराकला दोन्ही देशांशी संबंध टिकवून ठेवायचे आव्हान पेलावे लागत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​