Uncategorized

तरुण तेजपालने पीडितेच्या ‘विसंगत’ जबाबांवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

पणजी : ‘तहलका’ मासिकाचे  संपादक तरुण तेजपाल यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपप्रकरणी लैंगिक अत्याचाराच्या खटल्यातील पीडितेच्या विसंगत विधानांवर संशय व्यक्त केला. त्यांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांना कायदेशीररित्या आव्हान दिले. नोव्हेंबर 2013 मध्ये गोव्यातील बांबोळी येथील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये तहलका मासिकाच्या अधिकृत कार्यक्रमादरम्यान, लिफ्टमध्ये सहकारी महिलेवर बळजबरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तेजपाल यांची 21 मे 2021 रोजी गोव्यातील म्हापसा येथील कनिष्ठ न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश क्षमा जोशी यांनी निर्दोष मुक्तता केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी सरकारच्या याचिकेवरील अंतिम युक्तिवाद ऐकण्यास सुरुवात केली.

तेजपाल यांचे अॅडव्होकेट आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला की, तक्रारदाराच्या जबाबात महत्त्वपूर्ण विसंगती होत्या. तेजपाल यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात, त्यांच्याविऊद्ध 2013 मध्ये दाखल करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या खटल्यातील पीडितेच्या विसंगत विधानांवर संशय व्यक्त केला. त्यांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांचा आधार घेत सरकारी पक्षाच्या घटनाक्रमाला आव्हान दिले. पोंडा यांनी युक्तिवाद केला की, फुटेज आणि तांत्रिक पुरावे तक्रारदाराच्या कथनाला दुजोरा देत नाहीत. त्यांनी तपास अधिकाऱ्यांसमोर दिलेले जबाब आणि खटल्यादरम्यान दिलेली साक्ष यामधील विसंगतींकडेही लक्ष वेधले. वरिष्ठ वकिलांनी तक्रारदाराने घटनेबाबत सुऊवातीला दिलेल्या माहितीमधील तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष भर दिला.

पोंडा यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराचा आरोप होता की, आरोपीने लिफ्टची बटणे दाबून ती सतत एकाच फेरीत (किंवा ‘सर्किट’मध्ये) फिरत राहील अशी स्थिती निर्माण केली होती, ज्यामुळे लिफ्ट कोणत्याही मजल्यावर थांबली नाही आणि दरवाजे बंद राहिल्याने ती आतच अडकून पडली. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, ज्या हॉटेलमधील लिफ्टमध्ये कथित घटना घडली होती, तेथील व्हिडिओ क्लिप्स खंडपीठासमोर दाखवण्यात आल्या, मात्र हे व्हिडिओ केवळ न्यायालयात उपस्थित असलेल्यांनाच पाहण्याची मुभा होती. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची तीन दिवसांची अंतिम सुनावणी गुरुवारपासून सुरु झाली आहे. या प्रकरणावरील युक्तिवाद शुक्रवार आणि शनिवारीही सुरू राहणार आहे. न्यायालयातील ही कार्यवाही पाहण्यासाठी गुरुवारी तेजपाल यांचे कुटुंबीय आणि मित्र, तसेच चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज हे उपस्थित होते.

सीसीटीव्ही फुटेजला आव्हान

सरकारी वकिलांनी याआधी ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये तळमजल्यावर लिफ्ट बाहेरील व्हिडीओ पुराव्यांचा उल्लेख करताना, त्यात सदर महिलेच्या वागणुकीत फरक पडल्याचे स्पष्ट केले होते. तेजपाल यांच्या वकिलांनी प्रकरणाशी संबंधित हॉटेलमधले सीसीटीव्ही फुटेज दाखवताना असा दावा केला की, तक्रारदाराच्या जबाबात अनेक विसंगती होत्या. त्यात तळमजल्यावरून वर जात असलेल्या लिफ्टमध्ये तेजपाल यांनी कोणतेही लैंगिक चाळे केल्याचा आरोप नाकारताना, या लिफ्टचे दार अधिक काळ बंद ठेवता येत नसल्याचा मुद्दा मांडला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​