Uncategorized

विशाल परब यांच्याकडून मत्स्य विक्रेत्यांना छत्र्या

ओटवणे प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून माजगाव नाला येथील मच्छी विक्रेत्यांना छत्र्या वितरण करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात माजगावचे सामाजिक कार्यकर्ते उदय माडखोलकर यांच्याहस्ते छत्र्या वितरित करण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात छत्री वितरण या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी उदय माडखोलकर यांनी लवकरच इतर व्यापाऱ्यांनाही छत्र्या देण्यात येणार असल्याचे सांगितले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​