Uncategorized

जनसुराज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहार राज्यातील बांकीपूर येथील विधानसभा पोटनिवडणूक जवळ येत असतानाच प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या पक्षाचे तीन मोठे नेते भारतीय जनता पक्षात समाविष्ट झाले आहेत. बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर उमेदवार आहेत. हे स्थान भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन नबीन यांनी सोडल्यामुळे रिक्त झाले आहे. नबीन यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा त्याग केला होता. त्यांची निवड बिहारम विधानसभेतूनच राज्यसभेवर झाली आहे. आता बांकीपूरमध्ये विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये बिहारमधील ख्यातनाम शिक्षणतज्ञ के. सी. सिन्हा यांचा समावेश आहे. तसेच रितेश राजन तथा बिट्टू सिंग आणि संदीप कुमार सिंग तथा गोपाल सिंग यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत या तीन्ही नेत्यांनी जनसुराज पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीत भाग घेतला होता. तथापि, ते तीन्ही पराभूत झाले होते. आता ते भारतीय जनता पक्षात आल्याने प्रशांत किशोर यांना मोठा धक्का बसला आहे. बांकीपूर पोटनिवडणुकीतही खरी चुरस भारतीय जनता पक्ष आणि जनसुराज पार्टी या पक्षांमध्ये होईल, असा कयास बांधण्यात आलेला आहे. प्रशांत किशोर यांच्या उमेदवारीमुळे हा संघर्ष अधिक रंगतदार बनल्याचे दिसून येत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​