Uncategorized

Vinayak Raut | …म्हणून माझ्यावर खोटे आरोप केले; सूनेने ठाण्यात गुन्हा दाखल करताच विनायक राऊत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबीयांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सून गिरीजा राऊत यांच्या तक्रारीवरून कौटुंबिक छळासह जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माध्यमांसमोर येत गिरीजा राऊत यांनी लग्नानंतर सात वर्षे मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि भावनिक छळ झाल्याचा आरोप केला. तसेच अघोरी उपचारांच्या नावाखाली विविध प्रकार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. याचवेळी, पती गितेश राऊत हे शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचा गंभीर आरोपही गिरीजा राऊत यांनी केला. हा मुद्दा लपवण्यासाठीच अघोरी उपचारांच्या नावाखाली विविध प्रकार करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

याशिवाय राजकीय प्रभावाचा वापर करून दबाव टाकण्यात आला, धमक्या देण्यात आल्या आणि सात वर्षे सतत मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही गिरीजा राऊत यांनी सांगितले. कुटुंबप्रमुख म्हणून विनायक राऊत यांनी योग्य भूमिका घेतली नाही, असाही आरोप त्यांनी केला.

दरम्यान, विनायक राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गिरीजा आणि गितेश गेल्या तीन वर्षांपासून वेगळे राहत असून त्यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तक्रारीपूर्वी आर्थिक मागण्या करण्यात आल्या होत्या, त्या पूर्ण न झाल्याने खोटे आरोप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. अघोरी उपचारांचे आरोपही त्यांनी नाकारले असून न्यायालयात सत्य समोर येईल, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​