Uncategorized

Sanjay Raut | एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत! देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास ‘हा’ नेता बसणार खुर्चीवर; संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. त्यामुळे आता राज्याचे भावी मुख्यमंत्री कोण होणार यासाठी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.. मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत अनेकांची नावे समोर येत आहेत.. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.. तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही,असा दावा त्यांनी केला आहे..

काय म्हणाले संजय राऊत ?

मुख्यमंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे सक्षम नेतृत्व आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला. तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही, असा पुनरूच्चार संजय राऊत यांनी केला. तर मीच ओरिजनल भाजपाई, भाजपचा संस्थापक असल्याचा दावा केल्यास ते मुख्यमंत्री होतील, असा खोचक टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.संजय राऊत यांनी आज रविवारी माध्यमांशी संवाद साधला .. यावेळी ते बोलत होते..

राऊत पुढे म्हणाले, . शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही. शिवसेना फोडण्यासाठी फक्त त्यांचा वापर केला. त्यांना फोडून त्याची बक्षीस म्हणून मुख्यमंत्री केलं. एवढंच. त्यांचा कार्यभार संपला आहे. हा जर फडणवीस केंद्रात गेले तर शिंदे मुख्यमंत्री होत नाही. भाजपचा होईल. जर शिंदे भाजपमध्ये गेले. पक्ष विलीन केलं. आणि मी ओरिजनल भाजपवाला आहे. मीच भाजपची स्थापना केली. मी भाजपचा जन्मदाता आहे. अमित शाह कल का बच्चा आहे. बावनकुळे आणि महाजन हे माझे कार्यकर्ते आहेत, असं शिंदे म्हणाले तर ते कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतील. पण बावनकुळे हे अधिक सक्षम आहेत. ते मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं, असे ते म्हणाले


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​