Tukaram Mundhe तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शाळांच्या उपाहारगृहांकडे

प्रतिनिधी, मुंबई :
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीएने अनेक मिठाई तयार करणाऱ्या दुकानांवर, हॉटेल्सवर, दूध उत्पादकांवर धाड टाकल्या आहेत. राज्यातील अनेक प्रसिद्ध दुकानांवरही एफडीएने कारवाई केल्याने त्यांचे परवानेही रद्द केले आहेत. त्यामुळे संपूर्ण पावसाळी अधिवेशनात राज्यातील अनेक आमदारांनी मुढेंची या खात्यातून आता कोणत्याही ठिकाणी बदली करू नये, अशी मागणी केली आहे. अशातच आता तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा शाळांच्या उपाहारगृहांकडे आणि महापालिकांच्या शाळांमध्ये मिळणाऱ्या भोजनांकडे वळवला आहे.
अनेक आश्रमशाळा आणि महापालिकांच्या शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या जेवणामध्ये याआधी अनेकदा शरीराला घातक अशा गोष्टी आढळून आल्या होत्या. त्यामुळे आता मध्यान्ह भोजन व शाळांमधील उपाहारगृहांच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन सरसावले आहे. आता मुंबईतील खासगी शाळांमधील उपाहारगृहे तसेच मध्यान्ह भोजन पुरविणारे किचन शेड यांच्यावर एफडीएची करडी नजर असणार आहे.
यासंदर्भात मुंबईत विविध ठिकाणी शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि बचत गट चालकांसोबत शुक्रवारी (10 जुलै) एक महत्त्वाची बैठक पार पडली. ज्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा मानकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गतिमान कार्यवाही सुरू केली आहे. शालेय स्तरावर अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याचे पालन संबंधितांनी केले नाही, तर कठोर कारवाई करण्याचा इशारा या बैठकीत अन्न औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगरवाड यांनी दिला आहे.
पावसाळी अधिवेशनात विधानसभेत शाळेच्या जवळच्या परिसरात विकण्यात येणाऱ्या स्टिंग एनर्जी ड्रिंकबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी शाळांच्या परिसरात स्टिंगची विक्री होत असल्याचे मान्य केले. शाळांच्या 500 मीटर परिसरात ज्या प्रकारे अंमली पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आहेत, त्याच धर्तीवर स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवरही बंदी घालण्यात येईल. त्यासाठी आवश्यक आदेश तातडीने जारी करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी अनेक मेडिकल्सवर कारवाई केली आहे. त्यामुळे राज्यभरातील नागरिक त्यांना दुवा देत आहेत. त्यांनी राज्यात अवैध गुटखा आणि भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. लोकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी ते सातत्याने धाडी टाकत आहेत आणि दोषींवर गुन्हे दाखल करत आहेत.आता शाळांच्या उपाहारगृहांवर धाड टाकण्याचे सत्र अवलंबल्यानंतर अनेक पालक त्यांना दुवा देत आहेत.जेणेकरून आश्रम शाळेत त्यांचा पाल्य खराब जेवणामुळे आजारी पडणार नाही.
Source link



