Uncategorized

Odisha Robbery चारचाकी गाडीला बांधून एटीएम मशीन उखडले, पैसे लुटून चोरांचा पोबारा

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात चोरांच्या एका टोळीने त्यांच्या थार गाडीला दोरी बांधून एक एटीएम उपटून काढून  त्यातील रोकड घेऊन अवघ्या काही मिनिटांतच पसार झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी पहाटे खैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही चोरी सीसीटीव्हीमध्ये पूर्णपणे कैद झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास पाचपेक्षा जास्त लोक एका काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून एटीएम किऑस्कजवळ आले. त्यांनी आधी किऑस्कमध्ये घुसून मशीन उपटले, ते एका दोरीने त्यांच्या गाडीला बांधले आणि रस्त्यावरून ओढत एका निर्जन ठिकाणी नेले.

Robbery on Yesvantpur-Bikaner Express यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसवर पहाटे ३ वाजता दरोडा, महिलांसह प्रवाशांना मारहाण

चोरांनी एटीएम मशीन फोडले

चोरांनी त्या ठिकाणी असलेले एटीएम मशीन फोडून त्यातील सर्व रोकड काढून घेतली आणि ते खराब झालेले मशीन रस्त्याच्या मधोमध सोडून पळून गेले. एटीएममधून लुटलेल्या रोकडची नेमकी रक्कम अद्याप कळलेली नाही.

दरम्यान हा सगळा प्रकार एटीएम मशीनच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. पहाटे २:१४ वाजता, एक काळ्या रंगाची एसयूव्ही गाडी किऑस्कसमोर वेगाने येऊन थांबते. त्यानंतर अनेक माणसे एक जाड दोरी घेऊन गाडीतून उतरतात आणि दोरीचे एक टोक एसयूव्हीच्या मागच्या बाजूला बांधतात, तर दुसरे टोक आत नेऊन एटीएम मशीनला अडकवतात.

सीसीटिव्हीत काय दिसतं?

त्यानंतर गाडी वेगाने पुढे जाताना दिसते, त्यामुळे दोरी ताणली जाते आणि मशीन किऑस्कमधून पूर्णपणे उपटून बाहेर फेकले जाते, त्यामुळे मशीनचे अवशेष आणि तुटलेल्या फ्रेमचे तुकडे रस्त्यावर उडून गेल्याचे दिसतात .पहाटे २ वाजून १७ मिनिटांनी, ती टोळी पुन्हा आपल्या गाडीत बसून आणि वेगाने निघून जातात.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत या परिसरात चोरी आणि दरोड्याच्या अनेक घटना घडल्या असून, रहिवाशांनी पोलिसांची गस्त वाढवण्याची आणि अधिक कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच, खैरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नुकसान झालेले एटीएम जप्त केले. अधिकारी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून, या घटनेत सामील असलेले वाहन आणि व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​