मोशी दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू 70 तासांचा थरार, 7 मृतदेह ढिग्रायातून काढले बाहेर!

पिंपरी : मोशी येथील कचरा डेपोमध्ये ‘वेस्ट-टू-एनर्जी‘ प्रकल्पाच्या इमारतीवर कच्रयाचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेच्या ठिकाणी सुरू असलेल्या बचावकार्याला आज (शनिवार) मोठी गती मिळाली. ढिग्रायाखाली अडकलेल्या 7 कर्मच्रायांचे मृतदेह वेगवेगळ्या वेळेस बाहेर काढण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांची प्रचंड आगतिकता आक्रोशाच्या स्वरूपात समोर आली होती.पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी अशा सर्वांच्या हलगर्जीपणामुळेच आमची माणसं मारली असा आरोप नातेवाईकांनी केला..
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो मध्ये कार्यरत असण्राया वेस्ट टू एनर्जी प्रकल्पा च्या इमारतीवर कच्रयाचा प्रचंड मोठा ढीग कोसळला या ठिकानी साधारण 20 कर्मचारी कार्यरत होते, असा अंदाज पालिकेने सांगितला होता. त्यानंतर नऊ कर्मच्रायांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र इतर कर्मचारी त्या इमारतीच्या स्ट्रक्चर खाली गाडले गेले होते. त्यांना शोधण्यासाठी
गेल्या बुधवारपासून एनडीआरएफ, लष्कर, अग्निशमन दल आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध यंत्रणांकडून येथे अथक शोधमोहीम राबवली जात आहे. कच्रयाचा प्रचंड ढिगारा, विषारी वायू आणि कोसळलेल्या इमारतीचे कठीण काँक्रिट यांचे मोठे आव्हान असतानाही बचाव पथकाने आज दिवसभरात मोलाची कामगिरी केली. आज 11 जुलै रोजी दुपारपासून रात्रीपर्यंत अत्यंत काळजीपूर्वक मोहीम राबवून ढिग्रायाखाली अडकलेल्या 6 मृतदेहांचा शोध घेण्यात आला.
दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कठीण काँक्रिटचा भाग फोडण्यासाठी घटनास्थळी आणखी एक अत्याधुनिक ‘डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन‘ आणण्यात आले असून, युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात आली.
या बचाव मोहिमेत आज दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सर्वात आधी अक्षय सावंत आढळून आले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी सुनील कोरके (वय 40, रा. आळंदी) यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. सायंकाळी 6 वाजता मोशी येथील गंधर्वनगरीत राहणारे सन्नी माने (वय 39) यांचा शोध लागला.
यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असलेले महेश कुंभार (वय 33) आणि सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी मोशी येथील संजय गांधी नगरचे रहिवासी असलेले नागेश गायकवाड (वय 26) यांचा मृतदेह ढिग्रायाबाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर रात्री 7 वाजून 15 मिनिटांनी रणजीत पाटील (वय 22, रा. मोशी) यांना बाहेर काढण्यात आले
दुर्घटनाग्रस्त इमारतीचा स्लॅब आणि काँक्रिटचा कठीण भाग अत्यंत वजनदार असल्याने सामान्य यंत्रणेच्या साहाय्याने तो बाजूला करणे कठीण जात होते. हे आव्हान लक्षात घेऊन प्रशासनाने घटनास्थळी तातडीने अत्याधुनिक ‘डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन‘ पाचारण केले आहे. या अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने काँक्रिटचे अडथळे वेगाने दूर केले जात असून, त्यामुळे बचावकार्याला मोठा वेग आला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत यापूर्वी भावेश वाणी या कर्मच्रायाचा मृतदेह सुरुवातीलाच हाती लागला होता.
मृतांच्या कुटुंबियांना एकूण ?? लाख ऊपयांची मदत
या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी एकूण 40 लाख ऊपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये हा प्रकल्प चालवणाऱ्या अँटोनी वेस्ट ग्रुपचे 25 लाख ऊपये, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून 10 लाख ऊपये आणि राज्य सरकारकडून 5 लाख ऊपयांच्या मदतीचा समावेश आहे.
यासोबतच कुटुंबातील इच्छुक व्यक्तीला कंपनीत नोकरी आणि मृत व्यक्तीच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चदेखील कंपनी उचलणार आहे.
मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीत झालेल्या दुर्घटनेनंतर या वास्तूच्या अधिकृततेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेने या तीन मजली इमारतीपैकी केवळ तळमजल्यालाच बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला दिला असून, वरील दोन मजल्यांच्या बांधकामाला कोणतीही परवानगी नव्हती. ही अनधिकृत बांधकामे कोणाच्या संमतीने करण्यात आली आणि तेथे कँटीन व कॉन्फरन्स रूम कशी सुरू झाली, असे गंभीर प्रŽ आता उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, पर्यावरण विभागाने विनंती केल्यावर अवघ्या 24 तासांत बांधकाम विभागाने घाईघाईने प्रमाणपत्र दिल्याने प्रशासकीय पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला जात आहे.
Source link



