Uncategorized

Gokul Milk Union | गोकुळसाठी कुणी कितीही आकडे फुगवले तरी… अखेरच्या दिवशी १७५ ठरावांसह अंतिम चित्र स्पष्ट!

कोल्हापूर -कुणी कितीही आकडे फुगवले, दावे केले तरी सहनिबंधक कार्यालयात ५ हजार ४३९ ठराव दाखल झाल्याची अधिकृत आकडेवारी बुधवारी संध्याकाळी स्पष्ट झाली.

५६ संस्थांनी एकापेक्षा जास्त ठराव दाखल केल्याचे तपासणीत आढळल्याने त्यांना लागलीच नोटीस काढून आज (गुरुवारी) त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. दरम्यान, शेवटच्या दिवशी १७५ ठराव दाखल झाले.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी म्हणून दूध संस्थांकडून ठराव गोळा करण्याची प्रक्रिया २ जूनपासून सुरू झाली होती. बुधवारी १ जुलैला शेवटची मुदत होती. पहिल्या दिवसापासून सुरू झालेली ठराव दाखल करण्याची प्रक्रिया शेवटचा दिवस संपेपर्यंत सुरूच होती. शेवटच्या दिवशी १७५ ठराव दाखल झाले. त्यानंतर तत्काळ एकूण ठरावांची मोजणी करून त्यातील ठराव बाजूला काढण्यात ठराव दुबार झाले आहेत.

आता त्यांना तातडीने एकापेक्षा सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यातील एकच ठराव प्रारूप यादीत ठेवला जाणार आहे.प्रारूप यादी तयार करण्यासाठी आता सुनावणी झाल्यानंतर लगेच छाननीचे काम हाती घेतले जाणार आहे. सप्टेंबरमध्ये मतदान गृहीत धरून अंतिम मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यासाठी आता प्रारूप मतदार यादी तयार करून त्यावर हरकती व सुनावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

४२७ चे ठराव बाहेर काढणार
विभागीय उपनिबंधकांच्या आदेशाने अपात्र ठरलेल्या ४२७ संस्थांचे ठराव मतदार यादीतून बाहेर काढले जाणार आहेत. तशा सूचना गोकुळ प्रशासनाकडूनही प्राप्त झाल्या आहेत. ४२७ मधील १५८ संस्था या बंद असल्याने त्या अवसायनात काढल्याने त्यांचा मतदानाचा विषय निकाली निघाला आहे. उर्वरीत २६९ संस्था पात्र केल्या होत्या, पण आता त्या पुन्हा अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्या पात्रतेचा आदेश येत नाहीत, तोवर सहनिबंधक कार्यालयात त्या अपात्रच असल्याने त्यांच्या मताचा अधिकार काढून घेतला जाणार आहे. निकाल झाला तरच त्यात बदल होणार आहे, असे सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी स्पष्ट केले. २६९ पैकी १११ संस्थांनी न्यायालयात धाव घेत स्थगिती आणली आहे, पण त्याचा निकाल ८ जुलैला लागणार आहे. तोपर्यंत त्या अपात्रच राहणार आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​