Uncategorized

A strong voice for the Global South at the G-7 Summit.

जी-7 परिषदेत महत्त्वाचे म्हणजे भारत व फ्रान्स यांच्या संयुक्त कामगिरीचे अनोखे दर्शन जगाने पाहिले आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील भक्कम अशी द्विपक्षीय भागीदारी आणि सामाजिक संबंध अधिक दृढ झाले आहेत. येत्या काळातही विविध क्षेत्रात एकमेका सहाय्य करु या तत्वावर वाटचाल केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी प्रगत तंत्रज्ञान आणि संरक्षण यासह विविध क्षेत्रातील आपली विशेष जागतिक सामरिक भागीदारी अधिक उंचविण्यासाठी नाईस येथे विस्तृत चर्चा केली आहे.

(उत्तरार्ध)

जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने झालेल्या भारताच्या द्विपक्षीय बैठकांचा सारांश असा की, भारताने अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, कॅनडा, इटली, जर्मनी या प्रगत देशांच्या नेत्यांशी संपर्क साधून उभय देशातील आर्थिक व व्यापारी संबंधांना नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे.

नव्या जगामध्ये भारताने नेहमीच तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणावर भर दिला आहे, कृत्रिम प्रज्ञासारखे तंत्रज्ञान हे जगातील सर्व देशांना उपलब्ध व्हावे आणि त्याच्या न्याय व समतोल वापरासाठी काही नियम कायदे करून आणि आचारसंहितांचा विकास करण्यावर भारताचा भर आहे. भारताने आपल्या व्यापक डिजिटल सार्वजनिक पायाभूत भागीदारीचे सुविधांचे जगभर प्रदर्शन केले आहे. तसेच जगातील निम्मे डिजिटल व्यवहार आता भारतामध्ये होतात असे नमूद केले जात आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी कृत्रिम प्रज्ञा म्हणजे सर्वसमावेशक विकासाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन केले आणि अशा प्रगत तंत्रज्ञानाचे सर्वांना सहजपणे फायदे मिळावेत म्हणजेच तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याचे त्यांनी यथार्थ आवाहन केले आहे.

फ्रान्सच्या ईव्हीएममधील यशस्वी सहभागानंतर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी युवा टेक 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी पॅरिस येथे जाऊन आपली भूमिका मांडली. तेथे भारताने सर्वात मोठे व्यासपीठ उभारले आणि 130 पेक्षा अधिक स्टार्टअपनी आपले सादरीकरण करून जगातील उद्योजकांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रातील भारताचे सबळ आणि मजबूत स्थान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी भक्कमपणे मांडले आहे.

भारत फ्रान्स सामरिक भागीदारी

जी-7 परिषदेतील भारत व फ्रान्स यांच्या संयुक्त कामगिरीचे अनोखे दर्शन जगाने पाहिले. त्यामुळे भारत आणि फ्रान्स यांच्यातील भक्कम अशी द्विपक्षीय भागीदारी आणि सामाजिक संबंध अधिक दृढ झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी प्रगत तंत्रज्ञान आणि संरक्षण यासह विविध क्षेत्रातील आपली विशेष जागतिक सामरिक भागीदारी अधिक उंचविण्यासाठी नाईस येथे विस्तृत चर्चा केली आहे.

समारोप

जी-7 शिखर परिषदेमधील भारताची भूमिका ही ग्लोबल साउथ देशांचा बुलंद आवाज मांडणारी ठरली आहे. या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण हे भारताच्या सुस्पष्ट अशा दृष्टीचे प्रतिबिंब आहे.

भारताचे राजदूत मोहन कुमार यांनी म्हटल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अष्टपैलू नेतृत्वामुळे जी-7 परिषदेतील भारताचे महत्त्व वाढले आहे. त्यांच्या नेतृत्वाचा दबदबा उंचावला आहे.

भू राजनैतिक दृष्टीने विचार करता जी-7 परिषदेत भारताची भूमिका यशस्वी ठरली आहे ती दोन कारणांमुळे. पहिले कारण म्हणजे भारत एक प्रभावी मध्यस्थ म्हणून पर्याय आहे आणि दुसरे कारण म्हणजे आपल्या प्रगती तंत्रज्ञानाचा प्रभाव टाकून भारताने जगातील प्रगत देशांवर उत्तम प्रकारे आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तिसरे म्हणजे या परिषदेने आखाती युद्धानंतरच्या बदलत्या वातावरणात संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून शांतता निर्माण करणे आणि व्यवस्था सुरळीत करणे यावर भारताने भर दिला आहे. भारत हा एक विश्वासू आणि जबाबदार देश म्हणून जगात पुढे आला आहे. प्रश्न युक्रेनचा असो की इराणचा असो भारताने घेतलेली समतोल भूमिका ही जगावर नैतिक प्रभाव टाकणारी ठरली आहे.

व्यापार, ऊर्जा आणि तंत्रज्ञान या तीन मुद्यांवर भर देऊन भारताने दक्षिणेकडील देशांचे प्रश्न बुलंदपणे मांडले आणि त्यांच्या विकासातील भागीदारीवर अधिक भर दिला आहे. जगाच्या दक्षिणेकडील देशांचा न्याय व समतोल विकास हाच पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या कृतिशील परिसहभागाचा संदेश होय.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​