Uncategorized

Pakistan Army Aattack पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानात हल्ला 36 नागरिक ठार, 163 जखमी झाल्याचा दावा

► वृत्तसंस्था
काबूल
पाकिस्तानी हवाई हल्ल्यात 36 अफगाण नागरिक ठार आणि 163 जण जखमी झाल्याचा दावा तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाण सरकारने केला आहे. पाकिस्तानच्या पक्तिका आणि कुनार प्रांतांमधील सीमापार लष्करी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. सोमवारी सोशल मीडियावर माहिती देताना, तालिबान सरकारचे उपप्रवक्त हमदुल्ला फितरत यांनी मोठी जीवितहानी झाल्याचे स्पष्ट केले. रविवारी रात्रीच्या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह 36 नागरिक ठार आणि 163 जण जखमी झाले आहेत.

याव्यतिरिक्त, तीन निवासी घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, असे त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानने नागरिकांच्या मृत्यूचा दावा करण्यापूर्वीच पाकिस्तानच्या ‘डॉन’ वृत्तपत्राने या सीमापार लष्करी कारवाईची बातमी दिली होती. यानंतर, पाकिस्तानी सरकारने या कारवाईचे समर्थन करताना हे प्रत्युत्तर असल्याचे म्हटले होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​