Uncategorized

White Snake found बिद्रीत सापडला पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ तस्कर साप !

प्रतिनिधी
सरवडे
कागल तालुक्यातील बिद्री कारखाना परिसरात सर्पमित्र सयाजी चौगले यांनी दुर्मिळ पांढ्रया रंगाचा तस्कर जातीचा बिनविषारी साप पकडला. पांढ्रया रंगाचा साप पहिल्यांदाच परिसरात सापडल्याने सापाला पाहायला लोकांनी गर्दी केली होती.
सर्पमित्र सयाजी चौगले यांना बिद्री कारखाना परिसरातून दारात पांढरा साप आल्याचा एकाने फोन केला. घटनास्थळी भेट दिल्यानंतर बिनविषारी तस्कर जातीचा पण दुर्मिळ असा पांढ्रया रंगाचा तो साप असल्याचे चौगले यांनी लोकांना सांगितले. साधारण चार फुटापर्यंत या सापाची लांबी आहे. हा साप घाबरल्यावर स्वत?च्या शरीराचा इंग्रजी ‘एस‘ अक्षरासारखा आकार करतो. उंदीर,पाली,सरडे, बेडूक हे त्याचे खाद्य आहे. याचे वास्तव्य सर्वत्र आढळते.

‘ जनुकीय बदलामुळे किंवा मेल्यानीन रंगद्रव्याच्या अभावामुळे काही वेळेला हा साप पांढ्रया किंवा फिकट पिवळ्या रंगाचा दिसतो. असा साप दिसल्यास त्याला मारू नका. वन विभाग किंवा स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क साधून त्याला जीवदान द्या‘


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​