Uncategorized

आंबोली जन आरोग्य समितीची सभा संपन्न

आंबोली : प्रतिनिधी

आयुष्यमान आरोग्य मंदिर आंबोली येथे जन आरोग्य समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची पहिली सभा संपन्न झाली . समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सौ. शोभा गुलाबराव गावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . यावेळी जिल्हा परिषद सदस्य शोभा गुलाबराव गावडे, शीतल नाईक ,आंबोली सरपंच सावित्री पालेकर ,गेळे सरपंच सागर ढोकरे , पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ रमेश कर्तस्कर ,वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद गहाणे , तसेच इतर आरोग्य अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते . या सभेत दिनांक २८ जून रोजी राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले . त्याबरोबरच मागील खर्चाची मान्यता मिळवून पुढील वर्षाचे नियोजन करण्यात आले . आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुमारे ४२ वर्षे जुनी असून अपुऱ्या जागेमुळे गैरसोय निर्माण होत असून चौकुळ, आंबोली इमारत दुरुस्तीचे निर्लेखन प्रस्तावित करण्यात आले . दाणोली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आल्याने जागेबाबत ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करावा असेही सभेत सूचित करण्यात आले . पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनी अपुऱ्या मनुष्यबळात काम करून जिल्ह्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व आरोग्य अधिकारी , कर्मचाऱ्यांचे कौतुक केले . तसेच आवश्यक तो औषध , इंजेक्शन साठा इतर माध्यमातून उपलब्ध करू असे निमंत्रित सदस्य तथा पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनी सभेस प्रतिपादित केले .

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​