Uncategorized
Sangli Crime News : पतीच्या छाताडावर बसून पत्नीने आवळला गळा

सांगली : पतीच्या छाताडावर बसून गळा आवळत प्रियकराच्या मदतीने त्याचा खून करणाऱ्या विवाहितेचा धक्कादायक कट विश्रामबाग पोलिसांनी उघडकीस आणला. घराबाहेर मारहाण झाल्याने पतीचा झोपेत मृत्यू झाल्याचा बनाव रचत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी संशयित पत्नीची पोलखोल केली. ही खळबळजनक घटना सांगलीतील पोळ मळा परिसरात उघडकीस आली.
प्रियकराच्या मदतीने केला खून दुकानात सेल्समन म्हणून काम करणारे २८ वर्षीय आनंद हणमंत सर्जे हे पत्नी आणि दोन मुलांसह पोळ मळा येथे राहत होते. गुरुवारी पहाटे पत्नी आणि मेहुण्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेहावरील गळ्यावरील ओरखडे पाहून पोलिसांना संशय आला. त्यानंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
पोलीस निरीक्षक सुधीर मालेराव आणि त्यांच्या पथकाने पत्नीची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान तिच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि अखेर खुनाचा संपूर्ण कट उघड झाला.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पती दारूच्या नशेत मारहाण आणि शिवीगाळ करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न खून केल्यानंतर संशय टाळण्यासाठी पत्नीने भावाला बोलावून घेतले आणि पतीला रुग्णालयात नेले.
त्यावेळी बाहेर कुणीतरी मारहाण केल्याने ते घरी येऊन झोपले होते, अशी बनावट कहाणी सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, दरम्यान, आनंद सर्जे यांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना दोन लहान मुले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताव्यात घेतले असून तपास पोलीस करत आहेत असल्याच्या रागातून पत्नीने २३ वर्षीय प्रियकरासोबत मिळून खुनाचा कट रचला. गुरुवारी पहाटे झालेल्या किरकोळ वादानंतर तिने प्रियकराला घरी बोलावले. दोघांनी मिळून आनंद सर्जे यांचे पाय ओढणीने बांधले आणि त्यांच्या छाताडावर बसून गळा दाबत त्यांचा खून केला.
Source link



