Uncategorized

कोल्हापुरात पावसाचा जोरदार धडाका

कोल्हापूर -गेली २० दिवस दडी मारलेल्या मान्सून दिलासा दिला. बुधवारी दुपारी कोसळलेल्या जोरदार सरींनी दिवसभर दमदार हजेरी लावली. शहर आणि परिसरासह जिल्ह्यात झालेल्या पावसाने खरीप पेरण्यांना वेग आला आहे.
दरम्यान, भर पावसात शेतकरी कुटुंबे पेरणीच्या कामात मग्न असल्याचे दिसून आले. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, अंबाबाई मंदिरातही भाविकांची गर्दी कमी असल्याचे चित्र पहायला मिळाले.

जिल्ह्यात १ जूनपासून पावसाने दडी मारली होती. जिल्हयाच्या काही भागात जमिनीत असलेल्या ओलीवरधुळवाफ पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या. उर्वरित ९० टक्के पेरण्या या कृषी विभागाने केलेल्या आवाहनामुळे थांबल्या होत्या. दरम्यान, धरणांतील पाणी पातळी कमी झाल्याने पिण्यासाठी राखीव साठा पाटबंधारे विभागाने ठेवला अन् उपसाबंदी लागू केली. पण उसासारखी पिके त्यामुळे अडचणीत आली. इरिगेशन फेडरेशनच्या आंदोलनामुळे तीन दिवस उपसाबंदी उठवण्यात आली.

शेतीला पाणी दिले गेले.दरम्यान, शेती उपसासाठी पाण्याची मुदत संपत असतानाच जिल्हयात मंगळवारी पावसाचे आगमन झाले.दरम्यान, बुधवारी पहाटे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या,सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारीही जोरदार सरींनी जिल्ह्याला झोडपून काढले. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने त्यातूनच वाहनधारकांना मार्ग काढावा लागला. 

दरम्यान, सोडलेल्या पाण्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबाबाई मंदिरातही पावसामुळे भाविकांची गर्दी कमी दिसून आली.मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी कुटुंबांची पेरणीसाठी धांदल उडाली आहे. शिवारातच शेतकरी कुटुंबे पेरणीत गुंतल्याचे चित्र बुधवारी ग्रामीण भागात पहायला मिळाले. अपेक्षित पाऊस झाल्याने खरीप पेरण्यांना वेग आल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कमाल तापमान २९.४ अंश सेल्सिअस असून किमान तापमान २१.२ अंश सेल्सिअश इतके नोंदले गेले. गुरूवारीही हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केंली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​