Uncategorized

युरोपच्या २६ देशांमध्ये उष्णतेची लाट

फ्रान्समध्ये सर्वाधिक उष्ण रात्र : अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याची वेळ

युरोपमधील 26 देशांना उष्णतेला लाटेला सामोरे जावे लागत असून फ्रान्स, स्पेन, ब्रिटन समवेत 15 देशांमध्ये उष्णतेवरून अलर्ट जारी करण्यात आला आहे. यातील बहुतांश देशांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक झाले आहे. फ्रान्सच्या निम्म्याहून अधिक हिस्स्यात उष्णता लाटेवरून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सरकारने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यावर बंदी घातली आहे.

  वृत्तसंस्था, पॅरिस

सोमवारी रात्री फ्रान्सने 1947 मध्ये नोंद सुरू झाल्यापासून सर्वात उष्ण रात्रीची नोंद केली आहे. फ्रान्सच्या अनेक हिस्स्यांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. फ्रान्समध्ये गोलफेश अणुऊर्जा प्रकल्प सोमवारी रात्री बंद करावा लागला. प्रकल्पाला थंड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गारोन नदीचे तापमान 28 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने हे पाऊल उचलावे लागले आहे.

फ्रान्समध्ये 40 हून अधिक जण बुडाले

उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून लोक नदी, सरोवरं आणि कालव्यांमध्ये उतरत आहेत. यादरम्यान मागील काही दिवसांमध्ये 40 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये युवांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती फ्रान्सच्या पंतप्रधानांनी दिली आहे.

खबरदारीदाखल पाऊल

भीषण उष्णतेमुळे 1350 हून अधिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर उष्णतेमुळे सरकारने ‘फेत द ला म्युझिक“ नावाच्या वार्षिक संगीत महोत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यावर बंदी घातली आहे. हा संगीत महोत्सव दरवर्षी पूर्ण फ्रान्समध्ये आयोजित केला जातो आणि यात लाखो लोक रस्त्यांवर उतरून सहभागी होत असतात. अत्याधिक उष्णतेत मद्यप्राशन लोकांसाठी आरोग्य जोखीम वाढवू शकते अशी भीती सरकारला होती. याचमुळे रेड अलर्ट युक्त क्षेत्रांमध्ये ही बंदी लागू करण्यात आली आहे.

वर्तमान उष्णतेच्या लाटेची तीव्रता ऑगस्ट 2003 च्या उष्णतेशी अत्यंत मिळतीजुळती असल्याचे फ्रान्सची हवामान संस्था मेटियो-फ्रान्सने सांगितले आहे. 2003 साली फ्रान्समध्ये 16 दिवसांपर्यंत भीषण उष्णतेच्या लाटेमुळे सुमारे 15 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. याला युरोपच्या इतिहासात सर्वात घातक उष्णतेच्या घटनांपैकी एक मानले जाते.

ब्रिटनमध्ये मोडला जाणार विक्रम

ब्रिटनच्या हवामान विभागानुसार बुधवारी तापमान 39 अंशांपेक्षा अधिक राहिले आहे. यामुळे जून महिन्यातील 35.6 अंशाचा राष्ट्रीय विक्रम मोडला गेला असून तो 1976 मध्ये नोंदविला गेला होता. अधिक आर्द्रतेमुळे उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने गुरुवारसाठी रेड एक्सट्रीम हीट वॉर्निंग जारी केला आहे. उष्णता लोकांचे आरोग्य, परिवहन आणि आवश्यक सेवांवर गंभीर प्रभाव पाडण्याची शक्यता असल्यास हा इशारा जारी करण्यात येतो. ब्रिटनमध्ये ट्रॉपिकल नाइट्सची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, म्हणजेच रात्री देखील तापमान 20 अंशांपेक्षा कमी होणार नाही.

स्पेन, जर्मनी, बेल्जियम, इटली बेहाल

स्पेनच्या काही हिस्स्यांमध्ये तापमान 38-40 अंशांपेक्षा अधिक राहिले आहे. काही हिस्स्यांमध्ये रविवार रात्रीपासून तापमान 30 अंशाखाली आलेले नाही. हवामान विभागानुसार ही ट्रॉपिकल नाइटची स्थिती आहे. जर्मनीतही उष्णतेचा प्रभाव दिसून येतोय. मागील एक आठवड्यात जर्मनीत नदीत उतरलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. बवेरियातील सरोवरांमध्ये 2 युवकांचा तर बाल्टिक समुद्रात एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. वर्तमान उष्णता देशाच्या इतिहासातील सर्वात भीषण उष्मालाट असू शकते असे बेल्जियमच्या हवामान तज्ञांचे सांगणे आहे. तापमान वाढल्यामुळे तेथील अनेक शाळांचे वेळापत्रक बदलावे लागले आहे. इटलीच्या आरोग्य मंत्रालयाने रोम आणि मिलान समवेत 16 शहरांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. रोममध्ये नव्या इलेक्ट्रिक बसेसच्या बॅटऱ्या वेगाने डिस्चार्ज होत आहेत, कारण एअर कंडिनशर सातत्याने सुरू ठेवावे लागत आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​