Uncategorized

दिल्लीत उद्योग भवनजवळ झोपडपट्टीत भीषण आग

20 अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राजधानी दिल्लीत उद्योग भवन परिसराजवळील झोपडपट्टीत बुधवारी पहाटे भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला ती विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. घटनास्थळी 20 अग्निशमन गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. आग कशी लागली याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. यासंबंधी सखोल तपास सुरू आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग एका इलेक्ट्रिकल पॅनलमधून सुरू झाली आणि वेगाने जवळच्या झोपड्यांमध्ये पसरली. झोपड्यांमधील सर्व सामान आगीत जळून खाक झाले, असे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कामगारांनी तात्काळ स्थलांतर केल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना टळली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​