Uncategorized

Solapur Local Authority Election: भाजपचे राजेंद्र राऊत ३६५ मतांनी विजयी; महाविकास आघाडीचा दारुण पराभव!

 

सोलापूर : सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी दणदणीत विजय मिळविला. राऊत यांना पहिल्या पसंतीची 483 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव दौलतराव देशमुख यांना केवळ 118 मते मिळाली. त्यामुळे राऊत यांनी 365 मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला.

दरम्यान, सोमवारी (दि. २२) सकाळी आठ वाजता मतमोजणीत सुरुवातीपासूनच भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आघाडीवर होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, सदस्य आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने मतदान केल्याचे निकालातून स्पष्ट झाले. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वसंत देशमुख यांना अपेक्षित पाठिंबा मिळू न शकल्याने त्यांचा दारुण पराभव झाला. एकूण 615 मतदानांपैकी 602 मते वैध ठरली असून 13 मते अवैध ठरली. वैध मतांपैकी राऊत यांनी तब्बल 80 टक्क्यांहून अधिक मते मिळवत एकतर्फी विजय नोंदविला.

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने आपले संघटनबळ आणि स्थानिक पातळीवरील पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या विजयामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​