Uncategorized

तुषार मेहता पुन्हा सॉलिसिटर जनरल

तीन वर्षांचा नवा कार्यकाळ : केंद्र सरकारने दिली मंजुरी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने तुषार मेहता यांना भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तीन वर्षांसाठी पुन्हा नियुक्त करण्यास मंजुरी दिली आहे. ही नियुक्ती 1 जुलैपासून प्रभावी ठरणार आहे. मेहता यांची या पदावर तिसऱ्यांदा पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. तर यापूर्वी दोनवेळा त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आलेला आहे.

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून जारी आदेशानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने देशाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून तुषार मेहता यांना पदावर कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मेहता यांना सॉलिसिटर जनरल म्हणून तीन वर्षांसाठी पुन्हा नियुक्त करण्यास मंजुरी दिली आहे.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून सेवा बजावल्यावर मेहता यांना ऑक्टोबर 2018 मध्ये सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. केंद्र सरकारने मग 1 जुलै 2020 पासून प्रभावी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी आणि मग 2023 मध्ये पुन्हा नियुक्त केले होते.

मेहता यांनी सॉलिसिटर जनरल म्हणून जवळपास 8 वर्षे पूर्ण केली आहेत. तर नव्या कार्यकाळाच्या अखेरपर्यंत या पदावर ते 11 वर्षे पूर्ण करणार असल्याने देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळापर्यंत सेवा बजावणाऱ्या कायदा अधिकाऱ्यांपैकी ते एक ठरतील. सॉलिसिटर जनरल म्हणून मेहता यांनी सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांसमोर अनेक महत्त्वपूर्ण घटनात्मक, धोरणात्मक आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे.

अन्य नियुक्त्या

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सर्वोच्च न्यायालयासाठी 5 अतिरिक्त सॉलिसिटर जनरलना तीन वर्षांच्या अतिरिक्त कार्यकाळासाठी पुनर्नियुक्त करण्यासही मंजुरी दिली आहे. विक्रमजीत बॅनर्जी आणि के.एम. नटराज यांना 1 जुलैपासून पुनर्नियुक्त करण्यात आले आहे. तर एस. व्ही. राजू, एन. वेंकटरामन आणि ऐश्वर्या भाटी यांना 30 जूनपासून पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे. एका वेगळ्या निर्णयात दिल्ली उच्च न्यायालयासाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांच्या पुनर्नियुक्तीलाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 1 जुलैपासून 6 महिन्यांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत प्रभावी राहणार आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​