Uncategorized

बीएसएनएलकडून जिल्ह्यात फोर जीसह फायबर टू द होम सेवा

पत्रकार परिषदेत विभागीय सरव्यवस्थापकांची माहिती : 380 मोबाईल टॉवर्सद्वारे नेटवर्क

बेळगाव : बीएसएनएलतर्फे संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात सेवा पुरविली जात आहे. ज्यामध्ये फायबर टू द होम, फोर जी यासारख्या नव्या सेवांचा समावेश आहे. दुर्गम भागातही बीएसएनएलची फोर जी सेवा सुरू असल्याने ग्राहकांना चांगल्या सेवा मिळू लागल्या आहेत. जिल्ह्यातील 11 हजार 600 हून अधिक ग्राहकांना एफटीटीएची सेवा 2 लाखांहून अधिक ग्राहकांना व 1150 हून व्यावसायिक ग्राहकांना सेवा दिली जात असल्याची माहिती बीएसएनएलचे विभागीय सरव्यवस्थापक विकास जयकर यांनी शनिवारी  पत्रकार परिषदेवेळी दिली.

बेळगाव जिल्ह्यात 180 गावांमध्ये सेवा देण्यासाठी बीएसएनएलने 64 प्रेंचाईजींची नियुक्ती केली आहे. यापैकी 36 प्रेंचाईंजी ग्रामीण भागात परवडणाऱ्या दरात सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत. फायबर योजनेमुळे वेगवान इंटरनेट स्पीड ग्राहकांना मिळू लागला आहे. सध्या जिल्ह्यात 2 लाख मोबाईल ग्राहक असून 380 टॉवर्सद्वारे नेटवर्क उपलब्ध केले जात आहे. याबरोबरच 1150 एंटरप्रायजेस बिझिनेस ग्राहकांना सेवा पुरविली जात आहे.

जिल्ह्यातील नेटवर्क वाढविण्यासाठी बीएसएनएल प्रयत्नशील आहे. नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून जागतिक दर्जाची सेवा बीएसएनएल देत आहे. सध्या जिल्ह्यात असलेले 2 लाख ग्राहक पुढील दोन वर्षांमध्ये दहा लाखांपर्यंत वाढविण्याचे ध्येय निश्चित केले आहे. सध्या शहरासोबत ग्रामीण भागातही उत्तम सुविधा दिल्या जात असल्याने ग्राहकांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपसरव्यवस्थापक देवेंद्र जी, अतिरिक्त सरव्यवस्थापक श्रीकृष्ण वेटे यांच्यासह इतर उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​