Uncategorized
Nana Patekar in Khed नाना पाटेकर आज खेडमध्ये संवाद

| त. भा. प्रतिनिधी
खेड : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर २१ जून रोजी येथे येत आहेत. बज्म ए इमदादिया संचलित एम. आय. बी. गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहात दुपारी ३ वाजता आयोजित विशेष कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
ते प्रथमच येथे येत असून त्यांच्या दौऱ्याची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष ए. आर. डी. खतीब यांनी केले आहे.
Source link



