Uncategorized

Satara News | राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा दणका; परराज्यातील अवैध दोन कोटीचा मद्यसाठा जप्त

ट्रकमधून तब्बल १५०६ बॉक्स विदेशी मद्य जप्त!

लोणंद : सातारा जिल्ह्यातील लोणंदमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिनेस्टाईल धडक कारवाई करत तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे… विशेष म्हणजे हा संपूर्ण मद्यसाठा प्लॅस्टिक सिरॅमिकच्या गोण्यांच्या आड लपवून चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात आणला जात होता.

विभागीय भरारी पथक कोल्हापूर आणि भरारी पथक सातारा यांच्या संयुक्त कारवाईत सातारा–निरा रोडवरील लोणंद बसस्थानकासमोर सापळा रचण्यात आला… आणि अशोक लेलँडच्या चौदा चाकी ट्रकमध्ये मोठा साठा उघडकीस आला.

या कारवाईत गोवा राज्यात निर्मित आणि मध्यप्रदेशात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याचे तब्बल १५०६ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये पोलंड प्राईड व्हिस्की आणि रॉयल क्लासिक माल्ट व्हिस्कीचा समावेश असून महाराष्ट्रातील बाजारमूल्यानुसार या मद्याची किंमत एक कोटी एकाहत्तर लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

वाहनासह एकूण दोन कोटी नऊ लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​