Uncategorized

अल्जेरियावर 3-0 ने मात, मेस्सीची विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक

अल्जेरियावर 3-0 ने मात : सहा वर्ल्ड कप खेळणारा पहिला खेळाडू

वृत्तसंस्था 

कॅन्सस सिटी, मिसुरी : 38 वर्षीय लियोनेल मेस्सीने विश्वचषकातील आपली पहिली हॅट्ट्रिक नोंदवली आणि स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्तपणे अव्वल स्थान गाठले. त्याच्या या कामगिरीमुळे विद्यमान विजेत्या अर्जेंटिनाने अल्जेरियाविऊद्धच्या गट फेरीतील पहिल्या सामन्यात 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. देशाचे प्रतिनिधित्व केलेला हा त्याचा 200 वा सामना होता आणि वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारा सर्वांत वयस्कर खेळाडू बनला आहे.

मेस्सीने पहिला गोल सामन्याच्या सुऊवातीच्याच मिनिटांत ‘इंटर मियामी’चा सहकारी रॉड्रिगो डी पॉल याने दिलेल्या उत्कृष्ट पासवर केला, तर दुसरा गोल दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीला रिबाऊंड झालेल्या चेंडूवर केला. पेनल्टी बॉक्सच्या बाहेरून मारलेल्या फटक्यावर त्याने तिसरा गोल पूर्ण केला आणि त्यानंतर अर्जेंटिनाला मोठ्या संख्येने पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांनी उभे राहून त्याचे अभिनंदन केले.

मेस्सीच्या शानदार हॅट्ट्रिकमुळे अर्जेंटिनाला मागील विश्वचषकापेक्षा खूप चांगली सुऊवात मिळाली. चार वर्षांपूर्वी कतारमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांना पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियाकडून पराभव पत्करावा लागला होता. तरीही त्यातून सावरून त्यांनी तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले होते. अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लायोनेल स्कॅलोनी म्हणाले की, ‘पहिला सामना नेहमीच आव्हानात्मक असतो. मागील विश्वचषकात आमची सुऊवात अडखळती झाली होती आणि यावेळी आम्हाला चांगल्या सुऊवातीची गरज होती.’

मेस्सीने अल्जेरियाविऊद्ध आणखी दोन गोल करण्याच्या जवळ मजल मारली होती. त्यापैकी त्याचा एक फटका जाळीत गेला खरा, पण तो अतिशय सूक्ष्म फरकाने ऑफसाइड ठरल्यामुळे गोल रद्द करण्यात आला, तर दुसऱ्या सत्रातील आणखी एक फटका ‘क्रॉसबार’च्या अगदी थोड्या वरून बाहेर गेला. अल्जेरियाला सामन्याच्या सुऊवातीच्याच मिनिटांत गोल करण्याची सर्वोत्तम संधी मिळाली होती. मात्र ‘व्हीएआर’ तपासणीत खेळाडू ‘ऑफसाइड’ असल्याचे आढळल्याने तो गोल रद्द करण्यात आला. त्यानंतर काही वेळाने मेस्सीने गोल केला आणि उर्वरित सामना मेस्सी व अर्जेंटिनाचाच राहिला.

अर्जेंटिना सलग विजेतेपद मिळवण्याच्या आपल्या मोहिमेला टेक्सासच्या आर्लिंग्टनमध्ये पुढे चालू ठेवणार असून तिथे ते ऑस्ट्रियाविऊद्ध आणि नंतर जॉर्डनविऊद्ध खेळतील. अल्जेरियाचा संघ कॅलिफोर्नियाच्या सांता क्लारा येथे जॉर्डनविऊद्ध खेळेल आणि त्यानंतर कॅन्सस सिटी येथे गटातील आपल्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रियाचा सामना करेल.

मेस्सीची गोलांच्या उच्चांकाशी बरोबरी

मेस्सीच्या या तीन गोलमुळे त्याच्या कारकिर्दीतील एकूण गोलांची संख्या 16 झाली असून त्याने जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याने केलेल्या पहिल्या दोन गोलच्या वेळी अल्जेरियाकडून काही महत्त्वाच्या चुका झाल्या. विशेष म्हणजे सर्बिया आणि मॉन्टेनेग्रोविऊद्धच्या सामन्यातून मेस्सीने अर्जेंटिनासाठी विश्वचषकात पदार्पण केल्यास या दिवशी बरोबर 20 वर्षे पूर्ण झाली होती. त्या पहिल्या सामन्यातही त्याने गोल केला होता.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​