Uncategorized

झेकमधील मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

झेकमध्ये 17 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ग्रां प्रि युस्ती नाद लाबेम मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनने 12 सदस्यांचा संघ जाहीर केला असून यामध्ये प्रामुख्याने भारताची ऑलिम्पिकपदक विजेती लवलिना बोर्गोहेन आणि विद्यमान आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती प्रीती पवार यांचा समावेश आहे.

या स्पर्धेमध्ये विविध देशांचे अव्वल मुष्टीयोद्धे सहभागी होत आहेत. युरोपमध्ये मुष्टीयुद्ध स्पर्धेला गेल्या बऱ्याच वर्षांपासून अधिक प्राधान्य दिले जात असून तब्बल किमान पाच दशकांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धा वेळापत्रकामध्ये ग्राप्री युस्ती नाद लाबेम या स्पर्धेचा समावेश आहे. भारतीय महिला संघामध्ये लवलिना बोर्गोहेन (75 किलो गट) आणि प्रीती पवार (54 किलो गट), साक्षी (51 किलो गट), प्रिया (60 किलो गट), प्रवीण (65 किलो गट) यांचा समावेश आहे. मात्र या स्पर्धेसाठी जस्मिन लंबोरीया आणि अरुंधती चौधरी दुखापतीमुळे सहभागी होऊ शकणार नाहीत.

पुरूषांच्या विभागात जादुमणी सिंग (55 किलो गट), सचिन सिवाच (60 किलो गट), आदित्य प्रताप (65 किलो गट), सुमित (70 किलो गट), अंकुश (80 किलो गट), कपिल पोखारीया (90 किलो गट) आणि नरेंद्र (90 किलो वरील गटात ) भारताचे प्रतिनिधीत्व करतील.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​