अभिजीत दीपकेंवर युवकाने मारली थप्पड

जयपूरमधील आंदोलनादरम्यान गोंधळ
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका आंदोलनादरम्यान एका युवकाने कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना थप्पड मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी संबंधित युवकाला तात्काळ ताब्यात घेतले. जयपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ही घटना घडली. थप्पड मारणाऱ्या युवकाने अभिजीत दीपके यांची मानसिकता जिहादी असल्याचा आरोप केला. ते देशातील लोकांची विनाकारण दिशाभूल करत आहेत. मी जयपूरचा रहिवासी आणि एक राष्ट्रवादी आहे. माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, असेही सदर युवकाने म्हटले आहे.
नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) सोमवारी जयपूरमधील शहीद स्मारकासमोर आंदोलन करत होता. याचदरम्यान दीपके यांच्यावर युवकाने थप्पड मारल्याने आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. या आंदोलनात तरुण, विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यामध्ये वाढती बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील कथित अनियमितता, भरती परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटणे आणि इतर जनहितार्थ मुद्यांचा समावेश असल्याचे कार्यक्रम समन्वयक दीपक बलियान यांनी स्पष्ट केले आहे.
Source link



