Manoj Jarange visits Kolhapur मनोज जरांगे पाटील कोल्हापूर दौऱ्यावर, जाणून घ्या कसे असेल भेटी अन् बैठकांचे नियोजन

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मराठा समाजासाठी जाहीर करण्यात आलेल्या सर्व सवलतींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले होते. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सध्या जरांगे पाटील कोल्हापुरच्या दौऱ्यावर असून कोल्हापुरातील विविध ठिकाणी त्यांच्या भेटी प्रस्तावित असणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जरांगे पाटील रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कळंबा रोड येथील सिद्धी फार्म हाऊस येथे मुक्कामाला असणार आहेत.
सोमवारी सकाळी ९.३० वाजता अंबाबाई मंदिरास जरांगे कार्यकर्त्यांसमवेत भेट देतील. या भेटीनंतर जरांगे यांची शाहू जन्मस्थळ नर्सरी बाग येथे भेट होईल. यानंतर सकाळी दहाच्या दरम्यान न्यू पॅलेस कार्यकर्त्यांसोबत बैठक आणि दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर पॅलेस, म्युझियम पाहणी करुन जरांगे रवाना होतील
Source link



