Uncategorized

Nitin Gadkari | आता थेट १००% इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

मुंबई – सर्वात मोठी बातमी समोर येत आहे..इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारात सतत तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. याचा सर्वाधिक फटका हा भारतात बसला आहे.. सातत्याने भारताला तेलाच्या किमतीमध्ये वाढ करावी लागत आहे.यामुळे नागरिकांमधुन अनेकवेळा नाराजी देखील व्यक्त झाली आहे.. केंद्र सरकारकडून या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.. .

सरकारने अधिक इथेनॉलचे प्रमाण असलेल्या पेट्रोलवर उत्पादन शुल्कात मोठी सलवत जाहीर केली होती. अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, 22% ते 30% दरम्यान इथेनॉल असलेल्या पेट्रोलवर कोणतेही उत्पादन शुल्क आकारले जाणार नाही. केंद्र सरकारने 100% इथेनॉल इंधनाला हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. नागपुरात एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले आहे..

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी..

नितीन गडकरी म्हणाले, मला हे सांगताना आनंद होतोय की, १२ जून रोजी रात्री ८ वाजता मी १०० टक्के इथेनॉलचा वापर करण्यास मंजुरी देणाऱ्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. कधी काळी लोक यावर हसायचे. इथेनॉल प्रोजेक्ट रोखण्यासाठी नकारात्मक प्रचार मोहीम चालवल्या गेल्या. पण, आता हे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे

पुढे गडकरी म्हणाले की, पुढील दोन महिन्यांत ऑटोमोबाईल कंपन्या पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणणार आहेत. टोयोटा, सुझुकी, एमजी आणि ह्युंदाई यासारख्या कंपन्या पुढील दीड महिन्यात इथेनॉलवर आधारित वाहने बाजारात उतरवू शकतात


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​