Radhanagari Dam | राधानगरी धरणात केवळ २६% पाणीसाठा शिल्लक; संभाव्य टंचाईमुळे विसर्ग बंद

राधानगरी / महेश तिरवडे -गतवर्षी मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाने हजेरी लावली होती. मात्र यावर्षी जून महिन्याचा मध्य उजाडला तरी पावसाने पाठ फिरवल्याने राधानगरी धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. सध्या धरणात केवळ २६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात शासनाने धरणातून विसर्ग बंद केला आहे,
गतवर्षी 15 जूनच्या सुमारास 87मी मी इतका पाऊस झाला होता तर राधानगरी धरणात सुमारे (4.34) टी एम सी म्हणजे 52 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र पावसाला झालेल्या विलंबामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत 26 टक्के धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि नदी प्रवाहासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर भर दिला जात आहे.
सध्या राधानगरी धरणातील सद्यस्थिती दि. १४ जून २०२६, सकाळी ६ वाजता)
पाणी पातळी : २९५.७० फूट
एकूण पाणीसाठा : २१५९.२३ दशलक्ष घनफूट (२.१६ टीएमसी)
उपलब्ध पाणीसाठा : २६ टक्के
आजचा पाऊस : निरंक
एकूण पाऊस : ४० मिमी
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता दमदार पावसाकडे लागले आहे. वेळेत पाऊस न झाल्यास भविष्यात पाणी व्यवस्थापनाचे आव्हान वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Source link



