Uncategorized

Gokul Election 2026 राष्ट्रवादी काँग्रेस शक्तीप्रदर्शनाने देणार ठराव, ठराव धारकांसोबत स्वत: मंत्री हसन मुश्रीफ जाणार

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीकडे कोल्हापूरसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. गेले काही दिवस गोकुळच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अनेकदा आरोप प्रत्यारोपांचे वादळ उठले होते. त्यात आता महायुतीचे घटक असणारे मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळसाठीचे ठराव शक्तीप्रदर्शनासह सादर करणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठराव एकत्रित गोळा करून शक्तीप्रदर्शनाने ते सहनिबंधकांकडे दाखल करणार आहे, त्यासाठी ठरावधारकांसोबत मी स्वतः जाणार आहे, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. सहनिबंधक हे ठराव जर एक-एक अशा पद्धतीने घेणार असतील तर सर्वच ठरावधारक एकत्र मिळून जाणार आहेत. ठरावधारक संस्था प्रतिनिधी आधार कार्ड घेऊन आत जातील व त्यांच्या त्यांच्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणी त्या ठरावांची नोंद होईल, ठराव सुपूर्द करून ते पोहोच घेतील असा ठराव जमा करण्याचा घटनाक्रमच मंत्री मुश्रीफ यांनी सांगितला.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवर भाष्य करताना मुश्रीफ यांनी महायुती म्हणूनच लढवणार, महायुतीचाच चेअरमन होणार याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. ठराव दाखल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या शक्तीप्रदर्शनाच्या दिवसाची तारीख लवकरच कळवू असे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी सांगितले. तोपर्यंत कोणत्याही संस्थेने परस्पर ठराव सहनिबंधकाकडे सादर करू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​