धुरीवाडा येथे मटका जुगारावर एलसीबीची धडक कारवाई

१७ हजार ८६० रुपयांचे साहित्य जप्त
मालवण | प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) विशेष पथकाने मालवण पोलीस ठाणे हद्दीतील धुरीवाडा येथे मटका जुगारावर धडक कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजण्याच्या सुमारास धुरीवाडा, ता. मालवण येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी मनोज अनिल मयेकर (वय ४३, रा. धुरीवाडा, ता. मालवण) याला मटका जुगार चालविताना ताब्यात घेण्यात आले.कारवाईदरम्यान पोलिसांनी मटका जुगाराशी संबंधित साहित्य आणि रोकड असा एकूण १७ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा, आशिष जामदार तसेच महिला पोलीस अंमलदार स्वाती सावंत यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.जिल्ह्यात अवैध धंदे, जुगार व इतर बेकायदेशीर कृत्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
Source link



